नीती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदे काय बोलणार?

नीती आयोगाची सातवी महत्त्वाची बैठक आज होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा उपस्थित राहणार आहेत.

नीती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदे काय बोलणार?

नीती आयोगाची सातवी महत्त्वाची बैठक आज, ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या अंमलबजावणीबरोबरच तेलबिया आणि कडधान्ये तसेच नागरी प्रशासनाच्या बाबतीत देशाला स्वावलंबी बनविण्याबाबत चर्चा होणार आहे.

आजची बैठक ही २०१९ नंतर अशी पहिलीच बैठक असेल ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष उपस्थिती पाहायला मिळेल. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, विधानमंडळासह सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल, पदसिद्ध सदस्य, नीती आयोगाचे उपाध्यक्ष, नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून केंद्रीय मंत्र्यांचा समावेश देखील असणार आहे.

या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राचे महत्वाचे प्रश्न मांडणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.तर आजच्या या बैठकीपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी फारकत घेतली आहे. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.

हे ही वाचा:

अस्लम शेख… चुकीला माफी नाही!

आणि अविनाश साबळेने जिंकले राष्ट्रकुल स्पर्धा इतिहासातील स्टीपलचेसचे पहिले पदक

ममता बॅनर्जींचा आदेश दोन खासदारांनी धुडकावला!

रवी दहियाने पाकिस्तानच्या शरीफच्या नाकी’नऊ’ आणत जिंकले सोने

दरम्यान, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल केंद्रीय मंत्री हे परिषदेचे सदस्य असतात तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. केंद्रात सर्वप्रथम मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये प्रशासकीय परिषदेची पहिली बैठक झाली होती.

Exit mobile version