काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपुरातल्या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना कोरोना वाढीसाठी मोदी सरकारला जबाबदार धरले. त्यावरून पटोले यांच्या वर ट्वीटरद्वारे भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.
काय घडले नेमके?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पंढरपुरात सभा झाली. त्यानंतर पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना पटोले यांनी देशात कोरोनाचा संसर्ग वाढण्यासा मोदी सरकार जबाबदार आहे असे अजब तर्कट मांडले. त्याबरोबरच, सहा महिन्यांपूर्वीच राज्यात आणि देशात लसीकरण सुरू केलं असतं तर आजही ही परिस्थिती नसती उद्भवली असा हास्यास्पद दावा देखील त्यांनी केला.
हे ही वाचा:
रामायण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबईत सॅनिटाझर यंत्रणा बसविण्यासाठी जनहित याचिका दाखल
राज ठाकरेंनी मानले मोदी सरकारचे आभार
टीपू सुलतान जयंती साजरी करणारी शिवसेना
मेंदूला संसर्ग होण्यासाठी कोरोना जबाबदार असण्याची आवश्यकता नाही, त्यासाठी काँग्रेस नेता असणे पुरेसे असते…
असे म्हटले आहे.
मेंदूला संसर्ग होण्यासाठी कोरोना जबाबदार असण्याची आवश्यकता नाही, त्यासाठी काँग्रेस नेता असणे पुरेसे असते… pic.twitter.com/MVTrvrm9kC
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 16, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करताना नाना पटोले हे विसरले, की मुळात लस जानेवारी पासून उपलब्ध होऊ शकली होती. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी लसीकरण नेमके कसे करावे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.