मनुष्य- बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी वापरणार अत्याधुनिक तंत्रज्ञान

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले कार्यवाहीचे आदेश

मनुष्य- बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी वापरणार अत्याधुनिक तंत्रज्ञान

महाराष्ट्रात बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मनुष्य आणि बिबटे यांच्यात संघर्ष वाढतानाचे चित्र आहे. वन्यजीवांचे आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत तसेच नव्याने कायद्यांबाबत केंद्र सरकारकडे शिफारशी पाठविण्यात येणार आहेत. बिबट्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीच्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे वन मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

विधानभवनात सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबर सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यासह राज्यातील काही गावांमध्ये बिबट्यांचा वाढलेल्या वावराबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मागील अधिवेशनात यासंदर्भात प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले होते. या समितीचा निष्कर्ष आणि त्यांनी सुचविलेल्या उपायांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत मुनगंटीवार म्हणाले, बिबट्या पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. पिंजरे लावण्यात येतील. पिंजऱ्याची संख्या वाढवण्यात येणार असून ते अत्याधुनिक असतील. शहर किंवा गावात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी जी परवानगी लागते त्याला ऑनलाईन परवानगीची व्यवस्था करण्यात येईल.

हे ही वाचा:

वाढदिवस साजरा न करण्याचे अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पीओपीच्या गणेशमूर्तीकारांच्या पोटावर पाय देऊ नका

संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर अटकेत

मणिपूरच्या घटनेमुळे मोदी संतापले

वन्यजीव संवर्धन करतांना वन्यप्राणी आणि मानवी संघर्षाचा प्रश्न हा प्रमुख अडथळा ठरतो. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसान भरपाईची रक्कम तीस दिवसाच्या आत मिळावी, याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. देशात कुठे बिबट्यांची प्रजननक्षमता कमी करण्यासाठी प्रयोग झाले आहेत का? याचा अभ्यास करण्यात येईल. बिबटयांची नसबंदी कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश यावेळी संबंधितांना मंत्री मुनगंटीवार यांनी दिले.

Exit mobile version