लक्षात ठेवा, टीएमसीचे खासदार, मुख्यमंत्री दिल्लीतसुद्धा येतात- प्रवेश सिंह वर्मा

लक्षात ठेवा, टीएमसीचे खासदार, मुख्यमंत्री दिल्लीतसुद्धा येतात- प्रवेश सिंह वर्मा

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका संपताच हिंसा भडकली आहे. तृणमूल काँग्रेसकडून भाजपा कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. या हिंसाचारावरून भाजपाचे खासदार प्रवेश सिंह वर्मा यांनी ममता बॅनर्जींना इशारा दिला आहे.

बंगालमधील हिंसेवरून भाजपाचे खासदार प्रवेश सिंह वर्मा यांनी थेट टीएमसीलाच धमकावले आहे. याद राखा, बंगालच्या मुख्यमंत्री, टीएमसीचे खासदार आणि आमदारांना दिल्लीत यायचं आहे, हा इशाराच समजा, अशी उघड धमकीच वर्मा यांनी दिली आहे. थेट खासदारानेच मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या खासदारांना धमकावल्याने खळबळ उडाली आहे. प्रवेश सिंह वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे चिरंजीव आहेत.

निवडणुकीत जयपराजय होतच असतो. पण हत्या होत नाही. टीएमसीचे गुंड बंगालच्या विजयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करत आहेत, असं वर्मा यांनी म्हटलं आहे. टीएमसीचे गुंडं आमच्या कार्यकर्त्यांची हत्या करत आहेत. त्यांना मारहाण केली आहे. त्यांची वाहने तोडत आहेत. घरांना आग लावत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. तर बंगालचे भाजपा प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनीही या हिंसेवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका केली होती. मतमोजणीनंतर भाजपा कार्यकर्त्यांवर टीएमसी प्रायोजित हल्ले होत आहे, असा आरोप विजयवर्गीय यांनी केला होता.

हे ही वाचा:

मुंबईत ‘ड्राईव्ह इन’ लसीकरणाला सुरवात

यंदा राज्यात पाणी टंचाई नाही, वाचा सविस्तर…

एक जुलैपासून मुंबईतील शाळा सुरु होणार- शास्त्रज्ञ

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे निधन

कैलाश विजयवर्गीय सध्या बंगालमध्ये आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आज ४ मे रोजी बंगालमध्ये येत आहेत. निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपाच्या चार कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. तसेच चार हजारपेक्षा अधिक घरांवर हल्ले करण्यात आले आहेत, असं विजयवर्गीय म्हणाले.

Exit mobile version