तृणमूल नेत्याचा राडा…अडवला कोविड लसीचा ट्रक

तृणमूल नेत्याचा राडा…अडवला कोविड लसीचा ट्रक

बंगालमध्ये ममता बॅनर्जींना धडकी भरली. एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवैसी बंगालची विधानसभा निवडणूक लढवणाच्या चर्चा.

तृणमूल काँग्रेस पक्षाचा नेता आणि मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी याने राडा करताना राष्ट्रीय महामार्ग बंद केल्याची घटना पश्चिम बंगालमधल्या गलसी येथे घडली आहे. यामुळे रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली ज्यात कोविड लसीचा ट्रकही अडकला. चौधरी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत होते.

जमैत उलेमा ए हिंद या संघटनेचे प्रमुख असलेल्या सिद्दीकुल्लाह यांनी नव्या कृषी कायद्यांना विरोध करताना सामान्य जनतेला वेठीस धरले. आंदोलनाच्या नावाखाली केलेल्या चक्काजामचा अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. आंदोलनाच्या नौटंकीला वैतागलेल्या नागरिकांनी जेव्हा विरोध केला तेव्हा सिद्दीकुल्लाह या नागरिकांच्याच अंगावर लाकडी काठी घेऊन धावून गेले. या सगळ्या राड्यात कोविड लसीच्या ट्रकचाही खोळंबा झाला. या ट्रकलाही जाण्यासाठी रस्ता देण्यात आला नाही. अखेरीस या ट्रकला दुसरा रस्ता घेत २५ किमी अधिकचा प्रवास करावा लागला. 

भाजपाचे नेते आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी ट्विट करत चौधरी यांच्या आंदोलनाचा समाचार घेतला आहे.

Exit mobile version