रविवारी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (एनआयए) तर्फे पश्चिम बंगाल मधील तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. छत्रधर महतो असे या तृणमूल नेत्याचे नाव असून त्याच्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्याची हत्या केल्याचा आरोप आहे. महतो हा तृणमूल काँग्रेस पक्षाचा मोठा नेता असून जंगलमहल भागात त्याचे मोठे प्राबल्य आहे.
२८ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून कारवाई करत छत्रधर महतो याला ताब्यात घेतले. मार्च महिन्याच्या सुरवातीलाच एनआयएने महतो याला समन्स पाठवले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता प्रबीर महतो याच्या हत्येचा छत्रधर याच्यावर आरोप आहे. २००९ साली या आरोपात त्याला अटकही झाली होती. त्यावेळी छत्रधर महतो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातच होता. पक्षाच्या ‘पीपल्स कमिटी अगेन्स्ट पोलीस ऍट्रॉसिटीज’ या समितीचा तो संयोजक होता.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंना कणा नाही, हे सरकार बरखास्त करा
वाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ
जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम, भारतासाठी अभिमानाची बाब
बेकायदेशीर क्रिया प्रतिबंधक कायद्यान्वये (युएपीए) महतोला अटक करण्यात आली होती. पण या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात तो तुरुंगातून बाहेर आला. बाहेर आल्यावर त्याने तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याला तृणमूल काँग्रेसमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. छत्रधर हा तृणमूल पक्षासाठी अत्यंत महत्वाचे नाव असून जंगलमहल भागात पक्षाला यश मिळवून देण्यासाठी त्याची भूमिका महत्वाची असणार आहे. पण शनिवार २७ मार्च रोजी पश्चिम बंगाल निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर लगेचच रविवारी महतोला अटक केली आहे. ऐन निवडणूका सुरु असताना छत्रधरला झालेली अटक ही तृणमूल पक्षसाठी चिंतेची बाब मानली जात आहे.
दरम्यान लवकरच छत्रधरला एनआयए कोर्टसमोर हजर केले जाण्याशी शक्यता आहे. ही अटक राजकीय वैमनस्यातून केल्याचा आरोप छत्रधर महतो याने केला आहे