बंगालमध्ये मतदान केंद्रावर बॉम्बहल्ला करणाऱ्या टीएमसी नेत्याला अटक

बंगालमध्ये मतदान केंद्रावर बॉम्बहल्ला करणाऱ्या टीएमसी नेत्याला अटक

सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याला गुरुवारी सकाळी ७ वाजता समसेरगंज विधानसभा जागेची पोटनिवडणूक सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात अटक करण्यात आली. मतदान सुरू होण्याच्या काही तास आधी मतदारसंघात बॉम्ब फेकण्यात आले आणि अनरुल हक या तृणमूल नेत्याला या संदर्भात अटक करण्यात आली.

टीएमसीचे उमेदवार अमीरुल इस्लाम, जो मतदान केंद्राभोवती येरझाऱ्या घालताना दिसला होता. त्याने भाबडेपणाचा आव आणत असं सांगण्याचा प्रयत्न केला होता की, तो फक्त याची खात्री करत होता की त्याचे एजंट प्रत्येक मतदान केंद्रावर उपस्थित आहेत आणि त्यावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम आहे.

स्थानिक अहवालांनुसार, इस्लामने सांगितले की हक आणि त्याच्या सशस्त्र निष्ठावंतांनी या भागात टीएमसी कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला केला होता आणि त्यांचे नेतृत्व काँग्रेसचे उमेदवार जैदूर रहमान यांनी केले होते.

रहमान म्हणाले की, काँग्रेसमधील कोणीही बॉम्बस्फोटात सामील नव्हते आणि हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षातील अंतर्गत लढाईचा मुद्दा आहे. अनरुल इस्लाम हा जैदूर रहमानचा भाचा आहे.

२६ एप्रिल रोजी जेव्हा बंगालमध्ये आठ टप्प्यांच्या निवडणुकांपैकी सातव्य टप्प्याची निवडणूक झाली तेंव्हा समसेरगंजमध्ये निवडणूक होऊ शकली नव्हती. कारण काँग्रेसचे उमेदवार रजाऊल हक यांचे एप्रिलच्या सुरुवातीला कोविड-१९ मुळे निधन झाले होते.

हे ही वाचा:

अमरिंदर सिंग-अजित डोवाल भेटीत नेमके काय घडले?

लक्ष्मी येणार सोन्याच्या बिस्किटावरून!

मोदींच्या योजनेने भारावले बिल गेट्स! म्हणाले….

बँकेतून होणारे ऑटो डेबिट बंद! वाचा काय आहेत नवीन नियम

इस्लामने २०१६ च्या निवडणुकीत माकपच्या तोआब अलीचा सुमारे २०० मतांनी पराभव केला होता. या वेळी, माकप आणि काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार उभे केले असले तरी दोन्ही पक्षांनी मार्च-एप्रिलची निवडणूक मित्रपक्ष म्हणून लढवली होती. मोदस्सर हुसेन हे या जागेसाठी डावे उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार मिलन घोष आहेत.

Exit mobile version