तृणमूल कार्यकर्त्यांनी केला राज्यपालांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

तृणमूल कार्यकर्त्यांनी केला राज्यपालांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी गुरुवार, १३ मे रोजी राज्यातील हिंसाग्रस्त भागाचा दौरा केला. पण राज्यपालांचा हा दौरा सुरु असताना त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेस पक्षच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. यावेळी राज्यपालांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात आला तर राज्यपाल गो बॅक असे नारेही लगावण्यात आले.

निवडणूकीनंतर पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचाराने सारा देश हादरून गेला होता. निवडणूक जिंकल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंगालमध्ये हैदोस घातला होता. भारतीय जनता पक्षाच्या मतदार, समर्थक, कार्यकर्त्यांपासून ते थेट केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वांवर हल्ले करण्यात आले. ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हे हल्ले थांबले आहेत. पण तरीही राज्यातही नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी राज्यातील हिंसाग्रस्त भागाला भेट दिली.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका

पश्चिम बंगालच्या नागरिकांना पोलिसांचीच भीती

कोरोनाविरोधात भारत सरकारने काय केले? सत्य आणि गैरसमज

मुंबई असो किंवा तेल अवीव…दहशतवाद हा दहशतवाद आहे

कूच बिहार भागातून राज्यपालांचा प्रवास सुरु असतानाच त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आला. विशेष म्हणाजे या कार्यकर्त्यांना पोलिसांचा कोणताही धाक नव्हता. राज्यपाल धनकड यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा प्रसंग सांगितला. “जनता ही पोलिसांच्या आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दहशतीखाली आहे. सत्ताधारी पक्षाच्या डझनभर कार्यकर्त्यांनी माझा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला त्यांना कायद्याचे आणि पोलिसांचे कोणतेही भय नव्हते. माझ्या सुरक्षारक्षकांसोबत हुज्जत घालण्याच्या ते तयारीत होते. अखेर मला मध्ये पडणे भाग पडले.”

Exit mobile version