तृणमुलच्या नृशंसांचे कुत्र्याच्या पिल्लांना मारण्याचे घृणास्पद कृत्य

तृणमुलच्या नृशंसांचे कुत्र्याच्या पिल्लांना मारण्याचे घृणास्पद कृत्य

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळून जेमतेम एक दिवस झाला नाही, तोच तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपले रंग दाखवायला सुरूवात केली आहे. रविवारी (२ मे रोजी) एक भाजपा कार्यकर्ता अविजित सरकार याने फेसबुकवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सरकार याने व्हीडिओ प्रसारित करत आपल्या घरावर झालेला हल्ला आणि आपल्या घरातील कुत्र्याच्या पिल्लांनाही मारल्याच्या हृदयद्रावक घटनेबद्दल सांगून तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दुष्कृत्याचा दाखला दिला आहे.

या व्हिडिओत सरकार याने तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयाची आणि या कार्यकर्त्याच्या घराची अत्यंत क्रुरतेने मोडतोड केली. त्याशिवाय प्राणी प्रेमी असलेल्या सरकारकडच्या कुत्र्याच्या पिल्लांना देखील त्यांनी अत्यंत हिंस्रपद्धतीने मरण्यासाठी सोडून दिले. याबाबत देखील त्याने व्हिडिओत सांगितले. हे सांगताना सरकारला अश्रू अनावर झाले होते.

त्याने एका बेवारस कुत्रीला सियालदहहून आणले होते. तिने काही पिल्लांना जन्म दिला होता. तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी त्या पिल्लांना अत्यंत क्रुरपणे मारल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

११ कोटी लसींकरता केंद्राने मोजले १७३२ कोटी

नागपूरच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांची लूट

रायगड एमआयडीसीत शिवसेना-राष्ट्रवादीत राडा

कुबड्यांवर चालणाऱ्यांची पश्चिम बंगालबाबत बोलण्याची औकात नाही

त्यानंतर त्याने दुसरा व्हिडिओदेखील बनवला होता. ज्यात त्याने त्याच्या घरावर तृणमुलच्या गुंडांनी हल्ला केल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सरकारचे घर, संस्थेचे कार्यालय यांवर हल्ला केला. त्याबरोबरच त्याने हा हल्ला कलकत्त्याच्या वॉर्ड क्र. ३० मध्ये तृणमुलचे नेते परेश पॉल आणि स्वपन समंदर यांच्या नेतृत्वाखाली घडवण्यात आल्याचे देखील सांगितले आहे. त्याबरोबरच या व्हिडिओत त्यांने नार्केलडांगा पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याचे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार असे दोन व्हिडिओ केल्यामुळे तृणमुलच्या गुंडांनी त्याला मरेस्तोवर मारहाण केल्याचे कळले. तृणमुलचा विजय झाल्यापासून बंगालमध्ये सातत्याने भाजपा कार्यकर्त्यांवर हिंस्र हल्ले केले गेले आहेत. कित्येक ठिकाणी भाजपाच्या कार्यालयाला आग लावण्याचे देखील प्रकार घडले आहे.

Exit mobile version