अभाविप कार्यकर्त्याच्या घरावर तृणमूलच्या गुंडाचा हल्ला

अभाविप कार्यकर्त्याच्या घरावर तृणमूलच्या गुंडाचा हल्ला

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गुंडानी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला आहे. रिशव सरकार असे हल्ला झालेल्या कार्यकर्त्याचे नाव असून, तो अभाविपचा बराकपोर भागातील अध्यक्ष आहे. रिशव सरकारवर झालेल्या हल्ल्याने बंगालमधील लोकशाहीची दुरावस्था पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

२ मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्या निकालानंतर संपूर्ण राज्यात हिंसाचार उसळला. बंगालमध्ये झालेल्या या हिंसाचारानी सारा देश हादरला. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गुंडांनी कायदा हातात घेत भाजपाच्या कार्यकर्ते, नेते, मतदारांपासून ते थेट केंद्रीय मंत्री आणि राज्यपालांपर्यंत सर्वांनाच झुंडशाहीचा अनुभव दिला. लूट, मारहाण, हत्या इथपासून सामूहिक बलात्काराच्या घटनांपर्यंत हिंसेची अनेक रूपे पाहायला मिळाली.

हे ही वाचा:

‘ठाकरे सरकारचा पॅकेज देण्यावर विश्वास नाही, घेण्यावर आहे’

अनिल परबांनी शेतजमिनीवर बांधले अनधिकृत रिसॉर्ट

चला कोकणाला देऊ मदतीचा हात; मुंबई भाजपाने दिली हाक

एफकॉन्स कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

हा हिंसाचार अजूनही थांबायचे नाव घेत नाहीये. रविवार २३ मे रोजी रिशव सरकार या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी रिशवला तसेच त्याचे आई, वडील आणि भाऊ यांनाही मारहाण करण्यात आली. तर त्याच्या घराची लूट करण्यात आली. ज्यात लॅपटॉप, फोन अशा महत्वाच्या वस्तू होत्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून या हिंसाचाराला विरोधात आवाज उठवला असून रिशव सरकार आणि त्याच्या घराचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रिशवचे संपूर्ण घर अस्त्याव्यस्त झालेले दिसत आहे. यावेळी अभाविपने तृणमूल काँग्रेसवर टीकास्त्र डागले आहे. रिशवच्या घराची अवस्था ही पश्चिम बंगालमधल्या लोकशाहीसारखी आहे.

Exit mobile version