रावत यांनी मोडला कोश्यारींचा विक्रम

रावत यांनी मोडला कोश्यारींचा विक्रम

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी शुक्रवार, २ जुलै रोजी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवार, २ जुलै रोजी रात्री ११ च्या सुमारास राजभवन येथे जाऊन राज्यपाल बेबी रानी मौर्य यांच्याकडे रावत यांनी आपला राजीनामा सोपवला. पण हा राजीनामा देताना रावत यांनी एक अनोखा विक्रम केला आहे आणि हा विक्रम नोंदवताना रावत यांनी महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा विक्रम मोडला आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत हे राज्याचे आजवरचे सर्वात कमी कार्यकाळ लाभलेले मुख्यमंत्री ठरले आहेत. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळानंतर राजीनामा दिल्यामुळे तिरथ सिंह रावत यांच्याकडे पक्षाने मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवली होती. १० मार्च २०२१ रोजी तिरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. पण आता ४ महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत त्यांनी राजीनामा दिला आहे. २ जुलै २०२१ हा रावत यांचा मुख्यमंत्री म्हणून अखेरचा दिवस ठरला असून त्यांचा एकूण कार्यकाळ हा ११५ दिवसांचा राहिला आहे.

हे ही वाचा:

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांचा राजीनामा

तुम्हाला खुर्ची उबवायला दिली आहे काय?

जीएसटीमुळे अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन पर्यंत पोहोचेल

मराठी वाऱ्यावर; पण ठाकरे सरकारला उर्दूची काळजी

रावत यांचा हा ११५ दिवसांचा कार्यकाळ हा उत्तराखंड राज्याच्या आजवरच्या इतिहासातील एखाद्या मुख्यमंत्र्याचा सर्वात कमी कार्यकाळ आहे. हा एकप्रकारचा विक्रमच आहे. पण रावत यांच्या आधी हा विक्रम महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या नावे होता. रावत यांनी राजीनामा देण्याच्या अगोदर उत्तराखंड राज्यातील सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेली व्यक्ती म्हणजे भगत सिंह कोश्यारी हे होते.

३० ऑक्टोबर २००१ रोजी भगत सिंह कोश्यारी यांनी उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार हाती घेतला. तर २००२ साली उत्तराखंड राज्याच्या विधानसभा निवडणूका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव होऊन काँग्रेस पक्ष विजयी झाला. त्यामुळे कोश्यारी यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून कोश्यारी यांचा कार्यकाळ हा केवळ १२३ दिवसांचाच होता.

Exit mobile version