राज्यात राष्ट्रपती राजवट लागावी यासाठी जी कारणे लागतात त्यातील एकही कारण महाविकास आघाडी सरकारने शिल्लक ठेवले नाही. त्यामुळे राष्ट्रपती आता वाट बघत आहेत, असे सूचक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यांनी सोमवारी कोल्हापुरात केले.
राज्यपाल आणि सरकार यांच्यामधील वादाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. “तब्बल तीन परीक्षांचे पेपर फुटल्यानंतर त्याची पाळेमुळे राजकीय व्यक्तीपर्यंत पोहोचल्याचे दिसतचे आहे. म्हणूनच आम्ही सीबीआय चौकशीची मागणी आम्ही लावून धरणार आहे. राज्यपालांनी एखादा निरोप पाठवला तरी तुम्ही नाकारत असाल तर तो राज्यपालांचा अपमान आहे. राष्ट्रपती राजवट लावण्यासाठीची सगळी यादी पूर्ण झाली आहे. सगळी कारणं यांनी पूर्ण केली आहेत.”
हे ही वाचा:
शिवभोजन थाळीच्या नावावर दोन घोट ज्युस
गेले दोन वर्ष सरकार अस्तित्वातच नाही
ती म्हणते लाल किल्ला माझा, मला द्या!
बड्या धेंडांकडून १३ हजार कोटी वसूल
पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व गटांत उमेदवारी अर्ज भरले आहेत. दोन जागा मिळवल्याशिवाय भाजप आपले उमेदवार मागे घेणार नाही. केंद्रीय मंत्री अमित शहा दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर आले होते. अमित शाहबद्दल बोलताना पाटील म्हणाले, ‘सहकारातील खूप अनुभवी माणूस सहकार विभागाला लाभला आहे.’
विधानसभेच्या तारखेबाबत बोलताना पाटील म्हणाले, संविधानात असं लिहिले आहे की, राज्यपाल जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीची तारीख कळवतात तेव्हा त्यांच्या सूचनेचे पालन करायचे असते. पण इथे राज्यपालाच्या सूचनेचे पालन केले जात नाही. आणि राज्यपालांचा अवमान हा घटनेचा अवमान असतो.