टिळक, जगताप यांच्या मतदानावरील आक्षेप फेटाळले

टिळक, जगताप यांच्या मतदानावरील आक्षेप फेटाळले

सोमवार, २० जून रोजी विधानपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडले आहे. त्यादरम्यान, काँग्रेसने भारतीय जनता पार्टीच्या दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने कॉंग्रेसचा आक्षेप फेटाळला आहे. तसेच, मतांसाठी परवानगी घेतल्याचे भारतीय जनता पार्टीने स्पष्ट केले आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेते हे स्पष्ट होणार आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीचे मतदान नुकतेच पार पडले. याचा निकाल पाच वाजता लागणार असल्याची समोर माहिती समोर आली आहे. मात्र मतदान पार पडल्यानंतर लगेच काँग्रेसने भाजपाच्या दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतांवर आक्षेप घेतला आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, काँग्रेसने घेतलेला हा आक्षेप असंवेदनशील आहे. या दोन मतांसाठी आम्ही परवानगी घेतली होती, असे ते म्हणाले आहेत. भाजपानेया दोन मतांसाठी पत्र देऊन परवानगी घेतली होती. त्यामुळे कॉंग्रेसचा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळला आहे.

हे ही वाचा:

रेणू शर्मा खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल, मानसिक छळामुळे मुंडेंना ब्रेनस्ट्रोक

मलिक, देशमुखांची ‘सर्वोच्च’ निराशा

धक्कदायक! सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या

मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशिवाल्या मावळ्याचा!

तर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी देखील काँग्रेस किती विकृत दर्जाचं राजकारण करत आहे, हे सांगितले आहे. भातखळकर म्हणाले, या दोन नेत्यांची लोकशाहीवर असेलली निष्ठा यावेळी दिसून आली आहे. त्यांनी मतदान करून त्यांचं कर्तव्य बजावलं आहे. त्यांच्या हा लोकशाहीवरची निष्ठा पाहून उर भरून येतो. मात्र महाविकास आघाडी हे विकृत दर्जाचं राजकारण करत असल्याची टीका भातखळकरांनी केली आह. तसेच भाजपाचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या अंथरूणाला खिळून असलेल्या आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेऊन काँग्रेसने बेशरमपणाच्या सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत. तसेच परवानगी घेऊनच त्यांना मतदानाचा हक्क दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version