नाशिकच्या साहित्य संमेलनात आज (५ डिसेंबर) लोकसत्ता वृत्तपत्राचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली. या कृत्यावर विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून हे कृत्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
काही चुकीचे झाले असल्यास त्याचा निषेध झाला पाहिजे मात्र, साहित्य संमेलनात शाईफेक करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच चुकीच्या विचारांना योग्य तर्क आणि पुराव्यांनी उत्तर दिले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
शिवमंदिर हटविल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी
कसली स्टँड अप कॉमेडी, हा तर अजेंडा
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळे फासले
‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सर्वांचेच दैवत आहेत. काही चुकीचे लिहिले असेल तर त्याचा निषेधच झाला पाहिजे परंतु साहित्य संमेलनात शाईफेक करणे हे चुकीचे आणि निषेधार्ह आहे. संमेलन ही अभिव्यक्तीची जागा आहे. चुकीच्या विचारांना तर्क आणि पुराव्यांनी उत्तर दिले पाहिजे, असे फडणवीसांनी म्हटले आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सर्वांचेच दैवत आहेत.
काही चुकीचे लिहिले असेल तर त्याचा निषेधच झाला पाहिजे.
परंतू साहित्य संमेलनात शाईफेक करणे हे चुकीचे आणि निषेधार्ह आहे.
संमेलन ही अभिव्यक्तीची जागा आहे.
चुकीच्या विचारांना तर्क आणि पुराव्यांनी उत्तर दिले पाहिजे.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 5, 2021
गिरीश कुबेर यांनी त्यांच्या ‘रेनेसान्स स्टेट’ या पुस्तकातून छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारे लिखाण केल्याचा आक्षेप संभाजी ब्रिगेडने नोंदवला आहे. त्यामुळेच ही शाईफेक करण्यात आली आहे. नाशिक येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात एका परिसंवादात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर हे सहभागी होणार होते. त्यासाठीच ते नाशिक येथे दाखल झाले होते. तेव्हा त्यांच्यावर शाई फेकण्यात आली असून याची जबाबदारी संभाजी ब्रिगेड या संघटनेने स्वीकारली आहे.