ठाकरे सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असणारे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल परब यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी यासंबंधीची माहिती दिली असून नाशिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त या समितीचे प्रमुख असणार आहेत
महाराष्ट्रात जनता एकीकडे कोविड महामारीमुळे त्रस्त असताना दुसरीकडे सरकारमधील मंत्र्यांचे विविध कारनामे बाहेर येताना दिसत आहेत. आधी गृहमंत्री अनिल देशमुख यांना वसुलीच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागला आहे. तर आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
हे ही वाचा:
कोविडमुळे कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबांना निवृत्ती वेतन, विमाभरपाई
कोविडमुळे निराधार झालेल्या मुलांसाठी सरसावले मोदी सरकार
बनावट ओळखपत्राच्या आधारे अभिनेत्रीचे लसीकरण
सराईत गुन्हेगार महिलेला धाडसी अधिकाऱ्याने रेल्वे अपघातातून वाचवले
गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या आरटीओमध्ये सुरु असलेल्या महावसुली विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटील हे नाशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पाटील यांनी परिवहन विभागात बदल्यांचं रॅकेट कसं चालतं याचा पर्दाफाश आपल्या तक्रारीत केला आहे. उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे बदल्या मॅनेज करत असून ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करत आहेत असे पाटील यांनी म्हटले आहे. त्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचं अभय आहे, असा दावा पाटील यांनी तक्रारीत केला आहे. पाटील यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना दिले आहेत.
या आदेशानंतर आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे आणि नाशिक गुन्हे शाखेचे पोलीस उपयुक्त हे या समितीचे नेतृत्व करणार आहेत. याआधी बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने एनआयएला दिलेल्या जबाबामध्ये अनिल परब यांनी वसुली करायला सांगितल्याचे म्हटले होते तर त्यानंतर आता गजेंद्र पाटील यांची तक्रार समोर आली आहे. या सर्व प्रकारावरून विरोधातील भारतीय जनता पार्टी चांगलेच आक्रमक झाले असून अनिल परब यांच्यावर निशाणा साधला जात आहे.
Maharashtra: 3-member committee formed to inquire corruption allegation levelled against State Transport Min Anil Parab & others
"Nashik RTO inspector filed this complaint. Looking at issue inquiry committee headed by DCP Crime formed," Police Commissioner Nashik city said y'day pic.twitter.com/Wf9RZvDZzg
— ANI (@ANI) May 30, 2021