राज्य सरकारचा प्रताप! मुंबईत तीन लाख किलो डाळ सडून वाया

राज्य सरकारचा प्रताप! मुंबईत तीन लाख किलो डाळ सडून वाया

महाराष्ट्रात केंद्र सरकारने गरिबांसाठी पाठवलेली डाळ सडून वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार मिहीर कोटेचा यांनी हा प्रकार समोर आणला आहे. एका गोदामात सडून वाया गेलेली डाळ त्यांनी व्हीडीओ मार्फत दाखवली आणि ठाकरे सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश केला आहे.

महाराष्ट्रात सध्या कोविडची परिस्थिती बिकट झाली आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रूग्ण महाराष्ट्रात आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पंधरा दिवसांचा लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गोरगरिबांच्या रोजीरोटीचा प्रश्न उद्भवत आहे. अशातच पहिल्या लाॅकडाऊनच्या वेळी मोदी सरकारने राज्यातील गोरगरिब जनतेसाठी पाठवलेली डाळ राज्य सरकारच्या कारभारामुळे सडून वाया गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार मिहीर कोटेचा यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

हे ही वाचा:

ठाण्यातील जम्बो कोविड सेंटर वापराविना

नागपूरच्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत १०० खाटांचे कोविड सेंटर

सतत खोटारडी टीका केल्यावर फोन कोणत्या तोंडाने करायचा?

कठीण समय येता संघ कामास येतो

कोटेचा यांनी एका गोदामात जाऊन व्हिडीओ शुट करत सडलेली डाळ दाखवली. मोदी सरकारने गेल्या लाॅकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील गोरगरिब जनतेसाठी गहु, तांदूळ, डाळ पाठवली होती. राज्यातील पिवळ्या शिधापत्रक धारकांना ती डाळ वाटणे अपेक्षित होते. पण राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे हे धान्य वाया जात आहे. या संदर्भात राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे कोटेचा म्हणाले. तसेच राज्य सरकारने निर्णय न घेतल्यामुळे डाळ सडून वाया गेल्याचा त्यांनी आरोप केला. एकट्या मुंबई उपनगरात तीन लाख किलो डाळ वाया गेली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Exit mobile version