‘आगप्रकरणातील जखमींना दाखल करण्यास नकार देणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई करावी’

‘आगप्रकरणातील जखमींना दाखल करण्यास नकार देणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई करावी’

मुंबईतील ताडदेव भागातील भाटिया रुग्णालयात शनिवारी सकाळी आग लागली. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला तर १८ जण जखमी झाले. मात्र, आगीच्या घटनेनंतर जखमींना दवाखान्यात दाखल करायला घेऊन गेल्यानंतर काही हॉस्पिटल्सने नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.

जखमींना रुग्णालयांनी पैशांअभावी आणि कोविड टेस्ट अभावी रुग्णांना दाखल करण्यास नकार दिल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले. मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट, रिलायन्स आणि भायखळा येथील मसिना हॉस्पिटल यांनी या रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आग दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना स्थानिक हॅास्पिटल्सने दाखल करून द्यायला नकार दिल्याची माहिती असून याच कारणामुळे मृतांचा आकडा वाढला असल्याची माहिती आहे. तसेच हे सत्य असल्यास महापालिका आणि राज्य प्रशासनाने तात्काळ दखल घेत कारवाई करावी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच आरोपींवर कडक कारवाई व्हावी, असे फडणवीसांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

राजपथवर धावणार महाराष्ट्राचा चित्ररथ

झारखंडमध्ये दारू अखंड…घरोघरी दारूचा पुरवठा करणार

फेक न्यूज पसरवणाऱ्या पाकिस्तानी वेबसाईट आणि यूट्यूब चैनल्सवर भारत सरकारची कारवाई

‘विहंग गार्डन दंडमाफी बेकायदेशीर, घटनाविरोधी’

रिलायन्स, मसिना, वोक्हार्ट या रुग्णालयांना या आगीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी दाखल न करून घेण्याबाबत जाब विचारणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या घटनेत जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना ५ लाखांची तर केंद्राकडून २ लाखांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Exit mobile version