भाजपने लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची नवीन यादी जाहीर केली असून या महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. सोलापुरातून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. म्हणजे ते काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवतील, हे स्पष्ट झाले आहे. सोलापुरातून विद्यमान खासदार जयसिद्धेशवर स्वामी यांचे तिकीट कापण्यात आले आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघातून सुनील मेंढे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, गडचिरोली-चिमूरमधून अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपने आधी महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यानंतर रविवारी तीन उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यामुळे भाजप महाराष्ट्रात ४८ पैकी २३ जागांवर लढेल, हे स्पष्ट झाले आहे. महायुतीच्या जागावाटपावर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती. त्यानंतर भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २३ जागांवर विजय मिळवला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपची यादी जवळपास जाहीर झाली असल्याचे आणि अवघ्या काही जागांसाठी उमेदवार घोषित करणे बाकी असल्याचे सूचक वक्तव्य केले होते.
हे ही वाचा:
अभिनेत्री कंगना रणौत, अरुण गोविल भाजपच्या पाचव्या यादीत!
उज्जैनमधील महाकाल मंदिरात भस्म आरतीदरम्यान आग; पुजाऱ्यासह १३ जण जखमी
तांबड्या समुद्रात भारतीय नौदलाची करडी नजर, चाच्यांना ‘मामा’ बनवणार
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये जवानांसोबत साजरी केली होळी!
सोलापुरात आता काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राम सातपुते यांना संधी देण्यात आली आहे. राम सातपुते हे माळशिरसचे आमदार आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.