भारतीय जनता पार्टीच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना दाऊद गॅंग कडून जिवेमारण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी तात्काळ पोलीसांत तक्रार देण्यात आली असून, धमकी देणाऱ्यांचा तपास सुरु करण्यात आला आहे.
साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे. धमकीमध्ये, ‘मी इक्बाल कासकरचा माणूस बोलतोय असे सांगत तुझा खून होणार आहे, अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे. या घटनेनंतर भोपाळमधील टीटी नगर पोलीस ठाण्यात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्ररीत फोन करणार्याने स्वतःची ओळख दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा माणूस असल्याचे सांगितले होते. तेसुद्धा या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
‘अग्निपथ योजने’संबंधी गृहमंत्रालयाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
काश्मीरमध्ये पोलिस निरीक्षकाची गोळ्या घालून हत्या
१०० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी घेतली आईची भेट
काँग्रेसच्या महिला आंदोलनात महिलाच गायब
दरम्यान, घटनेवेळी साध्वी यांच्यासोबत असलेल्या लोकांनी फोनच्या संभाषणाचा व्हिडिओही रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांना नेमका फोन कुठून आला याबद्दल अजून माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी नुपूर शर्मा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याचे समर्थन साध्वी ठाकूर यांनी केले होते. त्यामुळे त्यांना धमकीचा फोन आल्याचे म्हटले जात आहे.