“ज्यांना खंडणीच कळते त्यांना समर्पण म्हणजे काय ते कळणार नाही” अशा शब्दात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोलेंनी आज सभागृहात भाजपावर राम मंदिर वर्गणीच्या मुद्द्यावरून हल्ला केला. “प्रभू श्रीरामांनी भाजपाला राम मंदिराच्या वर्गणीसाठीचं ‘कॉन्ट्रॅक्ट” दिलं आहे का?” असा सवाल त्यांनी केला.
देशात सगळीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील इतर संस्थांनी राम मंदिर निधी संकलनाचे काम सुरु केले आहे. आजवर ₹१५११ कोटींचा निधी जमा करण्यात आला आहे. पाचशे वर्षांहून अधिक काळ सुरु असलेला हिंदू समाजाचा संघर्ष आणि स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांहून अधिक काळचा संघर्ष, यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विवादित जागेवर राम मंदिरच बांधले जावे असा निकाल दिला. या निकालानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर निर्माण न्यासची स्थापना केली होती.
हे ही वाचा:
नाना पटोले यांनी राम मंदिर निधी संकलनाची थट्टा करत, “भाजपाला प्रभू श्रीरामांनी ‘वर्गणी’ गोळा करण्याचे ‘कॉन्ट्रॅक्ट’ दिले आहे का?” असा सवाल केला. पटोलेंच्या या प्रश्नावर भाजपाचे आमदार संतापले आणि विधानसभेत गदारोळ झाला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर देताना, “ज्यांना खंडणीची सवय आहे त्यांना समर्पणाचे महत्व कळणार नाही. हिम्मत असे तर राम मंदिर विषयावर चर्चा घ्या.” असे आव्हान त्यांनी सरकारला केले.