‘जे मोदींवर टीका करतात, त्यांना राज्यसभेचे तिकीट मिळते’

पंतप्रधान मोदी यांनी दिलेली जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत

‘जे मोदींवर टीका करतात, त्यांना राज्यसभेचे तिकीट मिळते’

तृणमूल काँग्रेसने राज्यसभेसाठी पत्रकार सागरिका घोष यांना तिकीट जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे पती राजदीप सरदेसाई यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीतील मोदी यांचे वक्तव्य नव्याने चर्चेत आले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी राजदीप सरदेसाई यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘माझ्यावर टीका करणाऱ्यांना पद्म पुरस्कार आणि राज्यसभा तिकीट दिले जाते,’ असा उल्लेख केला होता.

त्यानंतर सन २००८मध्ये काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या कार्यकाळात राजदीप सरदेसाई यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर, त्यांच्या पत्नी सागरिका घोष यांना आता तृणमूल काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

हे ही वाचा:

हल्द्वानी हिंसाचाराप्रकरणी ३० जणांना अटक

मोठा निर्णय! ‘सीआरपीएफ’ची परीक्षा मराठीत देता येणार

पंतप्रधान मोदींकडून रोजगार मेळाव्यात १ लाख नियुक्ती पत्रांचे वाटप

काँग्रेसला गळती; अशोक चव्हाणांनी सोडला काँगेसचा ‘हात’

नरेंद्र मोदी यांनी तेव्हा सातत्याने त्यांच्यावर टीका करणारे तत्कालीन काँग्रेस सरकार आणि काँग्रेसधार्जिण्या प्रसारमाध्यमांवर टीकास्त्र सोडले होते. काँग्रेसधार्जिण्यांना पद्म पुरस्कार आणि राज्यसभेची जागा मिळत असल्याचेही वक्तव्य मोदी यांनी केले होते. राजदीप सरदेसाई या मुलाखतीत त्यांना विचारत आहेत. ‘तुमच्यावर होणाऱ्या या टीकेकडे तुम्ही कशातऱ्हेने पाहता? तुम्हाला असे वाटते का, सन २००२च्या गुजरात दंगलीत तुम्हाल लक्ष्य केले गेले, असे तुम्हाला वाटते का?,’ असा प्रश्न राजदीप सरदेसाई यांनी मोदी यांना विचारला होता. त्यावर ‘गेल्या १० वर्षांपासून याच मुद्द्यावर बोलणाऱ्या राजदीप सरदेसाई यांना माझ्या शुभेच्छा.’ जेव्हा सरदेसाई यांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला असता मोदी यांनी त्यांना रोखले. ‘तुम्हाला ऐकावेच लागेल. यातूनच तुम्ही तुमचे उत्पन्न कमावत आहात. मी असेही ऐकले आहे की, जे मोदींवर टीका करतात, त्यांना राज्यसभेचे तिकीट मिळते, पद्मश्री किंवा पद्मभूषण मिळते. तुम्हाला तुमच्या याच मार्गावरून जाण्यासाठी खूप शुभेच्छा. राज्यसभेत जा आणि तुमच्या मित्रांच्या मदतीने पद्म पुरस्कार मिळवा,’ असे उत्तर तेव्हा मोदी यांनी दिले होते.

Exit mobile version