पंजाबमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी चरणजितसिंग चन्नी यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी निशाणा साधला आहे. शाह यांनी मुख्यमंत्री चन्नी यांना प्रश्न उपस्थित केला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, शाह लुधियाना येथे एका निवडणूक रॅलीत म्हणाले, “चन्नी साहेब पंजाबमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न पाहत आहेत. जो मुख्यमंत्री भारताच्या पंतप्रधानांना सुरक्षित रस्ता देऊ शकत नाही, तो पंजाबला सुरक्षा देऊ शकतो का?
५ जानेवारी रोजी पीएम मोदींचा ताफा फिरोजपूर-मोगा महामार्गावरील उड्डाणपुलावर थांबला होता कारण काही शेतकरी पुढे रस्त्यावर विरोध करत होते. वृत्तानुसार ते पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्याला विरोध करत होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तीन वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे मागे घेतल्यानंतर पीएम मोदी पंजाबमध्ये फिरोजपूरमध्ये त्यांच्या पहिल्या सभेला संबोधित करणार होते, परंतु कार्यक्रमाला संबोधित न करता ते दिल्लीला परतले.
हे ही वाचा:
…. म्हणून आयपीएलमध्ये युवा खेळाडूंसाठी एक कोटीची मर्यादा घाला
तुम्ही पाटील आहात, जोशीबुवांचे काम करू नका!
धक्कादायक! चंद्रभागेचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची नौदलाच्या साह्याने भर समुद्रात थरारक कारवाई
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेवर आल्यास अमली पदार्थांच्या सेवनाला आळा घालण्यासाठी चार जिल्ह्यांमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो शाखा कार्यालये उघडतील, असे आश्वासनही शहा यांनी दिले. ते म्हणाले की एनडीए सर्व जिल्ह्यांमध्ये अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स तयार करणार आहे.
पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुका होणार होत्या, परंतु नंतर त्या तारीख २० फेब्रुवारी करण्यात आली. तथापि, सर्व ११७ विधानसभा जागांसाठीची मतमोजणी मूळ वेळापत्रकानुसार १० मार्च रोजी होणार आहे.