ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचा उद्योग बंद करावा

ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचा उद्योग बंद करावा

ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचा उद्योग बंद करावा, असा हल्लाबोल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर केला. ते सांगलीतील झरे या गावात बोलत होते. एमपीएससी परीक्षा आणि रखडलेल्या नियुक्त्यांवरुन पडळकरींनी रोहित पवारांवर टीका केली.

आपल्या घरगुती वादात, दुसऱ्या मुलांचं भविष्य अंधारात लोटू नका. नीट वाचता न येणाऱ्या आमदार रोहित पवारांनी केंद्रावर नुसते सल्ले देण्याचे उद्योग बंद करावे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.  राज्यातील एमपीएससी परीक्षा, उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या आणि आयोग सदस्य नेमणूक यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर आमदार पडळकर यांनी सडकून टीका केली.

नियुक्त्यांबाबत घोषणा करुन ३० दिवस उलटले. रोहित पवारांनी सांगितलं होतं, पण आता ३१ तारीख उलटून गेली. लबाडी करण्यात हे माहीर आहेत, पण आता ते स्वत:च यावर वारंवार शिक्कामोर्तब करत आहेत, असा हल्लाबोल पडळकरांनी केला.

हे ही वाचा:

उपांत्य फेरीत लवलिनाचा पराभव तरीही ‘हे’ पदक केलं निश्चित

भारताचा चीनवर ‘हार्पून’ वार

भालाफेक, कुस्तीमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला

इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवायला भारत सज्ज

या नियुक्त्या तीस दिवस उलटले तरी झालेल्या नाहीत, आपल्या घरगुती वादात इतर पाल्यांचे भविष्य अंधारात लोटू नका, प्रशासनात आपल्या कुटुंबाची किती वचक आहे,असे तुणतुणे वाजवण्यात तुमचे आयुष्य गेले आहे. या तुणतुणे वाजवण्याच्या नादात दुसऱ्यांचे नुकसान करू नका. एमपीएससी परीक्षा कधी घेणार, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती कधी देणार, याचा ताळमेळ नाही, असं पडळकर म्हणाले.

Exit mobile version