कुबड्यांवर चालणाऱ्यांची पश्चिम बंगालबाबत बोलण्याची औकात काय?

कुबड्यांवर चालणाऱ्यांची पश्चिम बंगालबाबत बोलण्याची औकात काय?

आशिष शेलार यांची शिवसेनेला चपराक

भाजपाचे नेता आमदार आशिष शेलार यांनी निवडणुकांवरून महाराष्ट्रात जल्लोष करणाऱ्या आणि भाजपाला लक्ष्य करणाऱ्या सर्व पक्ष आणि नेत्यांना जबरदस्त चपराक लगावली आहे.

आशिष शेलार यांनी शिवसेनेवर बोचरी टीका करताना म्हटले आहे की, स्वतःच कुबड्यांवर आहेत, ज्यांचे पहिले पाऊल कुबड्यांशिवाय पडत नाही, त्यांची बेळगाव आणि पश्चिम बंगालवर बोलण्याची औकातच नाही. यावेळी त्यांनी बोलताना, आम्ही त्यांना पूर्ण पराभूत करू शकलो नाही हे खरे आहे, पण यशाचे मोजमाप फक्त भाजपाकडेच आहे. जितेंद्र आव्हाड बोलत असलेल्या अदृश्य शक्तीची काळजी काँग्रेसने करावी. या अदृश्य हातांनी काँग्रेस भूईसपाट झाली.

यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्यावरही जहाल टीका केली. नवाब मलिक बंगालमधल्या पराभवावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागत असतील, तर मग पंढरपूरमधल्या पराभवामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा देणार का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडीच्या एकएक नेत्याचा समाचार घेताना त्यांनी नाना पटोले यांनाही सोडले नाही. नाना पटोले व्यवहाराच्या सत्यतेवर माहिती ठेवत नाहीत. त्यांचे आयुष्य कालाकांडीत गेले. उचलली जीभ लावली टाळ्याला असा त्यांचा स्वभाव आहे. माहितीविना बोलणे म्हणजे कालाकांडी, नाना पटोलेंची पत्रकार परिषद असा टोला त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला.

हे ही वाचा:

११ कोटी लसींकरता केंद्राने मोजले १७३२ कोटी

नागपूरच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांची लूट

रायगड एमआयडीसीत शिवसेना-राष्ट्रवादीत राडा

लॉकडाउनच्या काळात नवे स्पुतनिक स्कॅम

केंद्राने आदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केल्यामुळे वादंग उठला होता. पुनावाला यांना आत्ताच सुरक्षा मागाविशी का वाटली? जर पुनावालांचे संकेत स्थानिक पक्षांकडे असतील तर हे प्रकरण गंभीर आहे. सध्याच्या पार्श्वभूमीवर सरकारला ही सुरक्षा देणे आवश्यक वाटले असेल, तर त्यात गैर काय? असा सवालही त्यांनी केला. त्याबरोबरच कोरोना काळात जनसेवेला प्राधान्य देण्याची भूमिका भाजपाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याबरोबरच या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांना उघडं पाडण्याचे काम भाजपा करेल, आमच्याकडे त्याची माहितीसुद्धा आहे. त्यामुळे त्यांनी खबरदार रहावे असा इशारा देखील त्यांनी दिला.

देवेंद्र फडणवीसांनी पंढरपूरात केलेले विधान गर्भितच होते असे देखील ते यावेळी म्हणाले. त्याबरोबरच त्यांनी भाजपाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेते यांच्याविषयी राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते विविध ठिकाणी कोणत्या भाषेत बोलतात ते पहावे. जनतेला मदत करण्याची आमची भूमिका स्पष्ट आहे. आमचे नेते जनतेला आधार देत आहेत. योग्यवेळी धोबीपछाड दिल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version