केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (४ जुलै) चंदीगड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बांधलेल्या २४×७ पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन केले. तसेच त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, विरोधकांना हवे ते म्हणू द्या, २०२९ मध्ये पुन्हा एनडीएचे सरकार येईल. विरोधक म्हणत होते सरकार ५ वर्षे टिकणार नाही, त्यांना मी सांगू इच्छितो की, मोदी सरकार पूर्ण ५ वर्षे टिकेल.
अमित शहा पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी १० वर्षात सर्जिकल स्टाइक आणि एयर स्टाइक केले. काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचे कामही पंतप्रधान मोदींनी केले. देशातील जनतेने मोदींच्या कार्यावर विश्वास ठेवला असून भविष्यातही त्यांचा विश्वास असणार आहे.
हे ही वाचा..
श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन उपक्रमाची उद्यापासून सुरुवात
आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार दिल्लीत !
मध्य प्रदेशात मंदिरालगतची भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू
नारायणपूरमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, २ आयईडी बॉम्ब जप्त !
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या दौऱ्यात ‘मणिमाजरा पाणीपुरवठा प्रकल्पा’चे उद्घाटन केले. या प्रकल्पासाठी ७५ कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. याचा परिसरातील एक लाखाहून अधिक लोकांना फायदा होणार आहे. ‘स्मार्ट सिटी मिशन’ अंतर्गत, सतत उच्च दाब पुरवठ्याद्वारे पाण्याचा साठा कमी करून अपव्यय रोखणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. याशिवाय अमित शाह यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे.