निवडून न येणारे विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात!

भाजपा नेते आशिष शेलार यांचा राज ठाकरेंना खोचक टोला 

निवडून न येणारे विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात!

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेची पदाधिकारी बैठक पडली. या बैठकीला संबोधित करताना मनसेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, एका खोक्या भाईचं काय घेऊन बसला आहात, विधानसभेत सगळे खोक्या भाईच भरलेले आहेत, त्यामुळे मुळ विषय बाजूला राहतात, तुम्हाला भलत्याच विषयांमध्ये भरकटून टाकले जाते. राज ठाकरेंच्या या टीकेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आशिष शेलार प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, एखादे वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी करणे,  आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणे हे आता महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थ, ज्यांनी काम केले अशा लोकांना निवडून दिले आहे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. ज्यांना निवडून येता येत नाही, त्यांना लोक निवडून देत नाहीत. ते विधानसभेत न जाता ते विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला.

हे ही वाचा : 

संभल हिंसाचार: शाही जामा मशिदीचा प्रमुख जफर अलीला अटक!

‘कीड़ा जडी’ – अनेक रोगांवर प्रभावी, किंमत ऐकून व्हाल थक्क!

गुणकारी ‘ब्रह्मदंडी’चे फायदे, जे तुम्हाला माहिती नसतील!

धोनीवर प्रश्न उपस्थित केले, बॅटने उत्तर देत गप्प केले – गावस्कर

दरम्यान, रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या बैठकीत राज ठाकरेंनी नवी पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यानुसार विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेमध्ये आता शहर अध्यक्ष आणि उप-शहर अध्यक्षपदांची निर्मिती करण्यात आली आहे. संदीप देशपांडे यांच्याकडे मुंबईच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
केंद्रीय समितीमध्ये बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अमित ठाकरे यांच्याकडे गट आणि शाखाध्यक्षांच्या प्रमुख पदांची जबाबदारी देण्यात आली आहे. नितीन सरदेसाई हे विभाग अध्यक्षांचे प्रमुख असणार आहेत.

 

Exit mobile version