आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेची पदाधिकारी बैठक पडली. या बैठकीला संबोधित करताना मनसेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, एका खोक्या भाईचं काय घेऊन बसला आहात, विधानसभेत सगळे खोक्या भाईच भरलेले आहेत, त्यामुळे मुळ विषय बाजूला राहतात, तुम्हाला भलत्याच विषयांमध्ये भरकटून टाकले जाते. राज ठाकरेंच्या या टीकेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
आशिष शेलार प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, एखादे वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी करणे, आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणे हे आता महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थ, ज्यांनी काम केले अशा लोकांना निवडून दिले आहे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. ज्यांना निवडून येता येत नाही, त्यांना लोक निवडून देत नाहीत. ते विधानसभेत न जाता ते विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला.
हे ही वाचा :
संभल हिंसाचार: शाही जामा मशिदीचा प्रमुख जफर अलीला अटक!
‘कीड़ा जडी’ – अनेक रोगांवर प्रभावी, किंमत ऐकून व्हाल थक्क!
गुणकारी ‘ब्रह्मदंडी’चे फायदे, जे तुम्हाला माहिती नसतील!
धोनीवर प्रश्न उपस्थित केले, बॅटने उत्तर देत गप्प केले – गावस्कर