उत्तर प्रदेश सरकारने झाशी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावावरून ‘वीरंगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन’ असे ठेवले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी हिंदीत ट्विट करून ही घोषणा केली.
“झाशी रेल्वे स्टेशन आता ‘वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन’ म्हणून ओळखले जाईल.” असे त्यांनी लिहिले. उत्तर मध्य रेल्वेचे मुख्य पीआरओ, प्रयागराज, शिवम शर्मा यांनी सांगितले की, “यूपी सरकारने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे आणि रेल्वेने या बदलाची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केली आहे.
उत्तर प्रदेश का 'झाँसी रेलवे स्टेशन' अब 'वीरांगना लक्ष्मीबाई रेलवे स्टेशन' के नाम से जाना जाएगा।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) December 29, 2021
अधिसूचनेत म्हटले आहे की २४ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या पत्रात गृह मंत्रालयाने दिलेल्या “ना-हरकत” प्रमाणपत्रानंतर नंतर स्टेशनचे नाव बदलण्यात आले.
यापूर्वी मुघलसराय रेल्वे स्थानकाचे नामकरण पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन आणि फैजाबाद रेल्वे स्टेशन अयोध्या कॅन्ट म्हणून करण्यात आले होते.
हे ही वाचा:
‘राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार स्थापण्याची मोदींची इच्छा होती!’ पवारांची नवीन पुडी
निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधी पुन्हा परदेशात पळाले
नारायण राणेंना सिंधुदुर्ग पोलिसांनी बजावलेली नोटीसच बेकायदेशीर
सत्तेत आल्यापासून, योगी आदित्यनाथ सरकारने फैजाबाद आणि अलाहाबाद जिल्ह्यांसह अनेक जागांची नावे बदलून पुन्हा जुनी नवे ठेवण्यात आली आहेत, ज्यांची नावे अनुक्रमे अयोध्या आणि प्रयागराज अशी ठेवण्यात आली आहेत.