27 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरराजकारणममतांचा पुन्हा पराभव करायला भाजपाकडून 'या' महिलेला उमेदवारी

ममतांचा पुन्हा पराभव करायला भाजपाकडून ‘या’ महिलेला उमेदवारी

Google News Follow

Related

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी आज भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपनेही फिल्डिंग लावली आहे. या हायव्होल्टेज लढतीसाठी भाजपाने वकील प्रियांका टिबरेवाल यांना उमेदवारी दिली आहे. तर माकपाने श्रीजीत विश्वास यांना मैदानात उतरवलं आहे. दुसरीकडे काँग्रेसने भवानीपूरमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक आयोगाने गेल्याच आठवड्यात पश्चिम बंगालमधील तीन विधानसभा निवडणुकांच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली. पश्चिम बंगालमध्ये काही महिन्यापूर्वी विधानसभा निवडणूक झाली होती. त्यावेळी २९४ जागांपैकी २१३ जागांवर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला. भाजपाचा पराभव झाला मात्र ७७ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. दुसरीकडे त्या निवडणुकी ममता बॅनर्जी यांनी आपला पारंपारिक मतदारसंघ भवानीपूर सोडून नंदीग्राममधून निवडणूक लढल्या होत्या. मात्र भाजपाच्या शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता.

ममता बॅनर्जी यांनी एकहाती झुंज देत पश्चिम बंगालमध्ये २१३ जागांसह बहुमत प्राप्त केलं. पण नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव त्यांचेच जुने सहकारी आणि या निवडणुकीत भाजपावासी झालेल्या शुभेंदू अधिकारी यांनी केला. या निवडणुकीत ममता यांना अवघ्या १ हजार ९५६ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या निकालानंतर नंदीग्राममधील मतदान आणि निवडणूक प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसंच आरोप-प्रत्यारोपही झाले.

हे ही वाचा:

भारत-इंग्लंड शेवटचा कसोटी सामना आजपासून

तालिबानच्या कब्जानंतर राशिद खानचा राजीनामा

चमच्याने बोगदा खणून कैदेतून सुटका

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

भाजपाने ममता बॅनर्जींविरोधात प्रियांका टिबरेवाल यांना मैदानात उतरवलं आहे. प्रियांका टिबरेवाल यांनी निवडणुकीतील हिंसाचारावरुन ममता सरकारला वारंवार कोर्टात घेरलं होतं. भाजपा नेते बाबूल सुप्रियो यांच्या कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. सुप्रियो यांच्या सल्ल्यानेच त्यांनी २०१४ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा