‘या’ तेलगू अभिनेत्रीचे मशिदीवर बिनधास्त बोल

‘या’ तेलगू अभिनेत्रीचे मशिदीवर बिनधास्त बोल

दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणू देसाई यांनी हिंदू मंदिरांवरील सरकारच्या ताब्यावर महत्वपूर्ण भाष्य केले आहे. “चर्च आणि मशिदींवर सरकारी ताबा नाही पण मंदिरांवर आहे. तरीही आपण स्वतःला ‘सेक्युलर’ म्हणवतो?” असा सवाल रेणू देसाई यांनी केला आहे.

भारतात हिंदू मंदिरांवर सरकारी कब्जा आहे असं म्हटल्यास अतिरेक ठरणार नाही. हिंदू मंदिरांना येणारे निधी हे सरकारी तिजोरीमध्ये जातात. विविध मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप असतो. केंद्र आणि राज्य सरकारे अनेकवेळा मंदिरांच्या ट्रस्टवर सरकारी अधिकारी नेमतात. यामुळे मंदिरांना मिळालेल्या देणग्या ज्या हिंदू भाविकांनी दिलेल्या असतात त्यांचा वापर हा धार्मिक कार्यासाठी करता येत नाही. निधी असून देखील हिंदू धर्माला, धर्माच्या जतनासाठी सरकारकडे दाद मागावी लागते.

याउलट, चर्च आणि मशिदींवर सरकारचा अंमल हा औषधालासुद्धा नसतो. या दोन्ही धर्मांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना मिळणारा निधी यावर सरकारचा ताबा नसतो. त्यामुळे सरकारी हस्तक्षेपाशिवाय चर्च आणि मशिदींना, मिळणारा पैसे हा धार्मिक कार्यांसाठी वापरता येतो. यासाठी त्यांना सरकारपुढे हात पसरावे लागत नाहीत.

हे ही वाचा:

एटीएसला मिळणार सचिन वाझेचा ताबा?

ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळातील गृहमंत्री बदलणार?

वाझे प्रकरणातील प्रॅडोचा मूळ मालक शिवसेनेचाच

याच विषयावर भाष्य करताना, प्रसिद्ध दक्षिण भरती अभिनेत्री रेणू देसाई यांनी असे सांगितले की, “चर्च आणि मशिदींवर सरकारी अंमल नाही आणि हिंदू मंदिरं सरकारच्या ताब्यात आहेत. तरीही आपण स्वतःला सेक्युलर म्हणवतो.” त्या पुढे जाऊन हेही म्हणाल्या की, “चर्च आणि मशिदींवर सरकारी अंमल यावा असं माझं म्हणणं नई, परंतु हिंदू मंदिरांवरही सरकारी अंमल असू नये.”

Exit mobile version