27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणशिवसेनेच्या 'या' नेत्याचा भाजपात प्रवेश

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश

Google News Follow

Related

पुण्यात शिवसेनेला मोठा धक्का

पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके भाजपात प्रवेश करणार आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत आशा बुचकेंचा पक्षप्रवेश होणार आहे. पुणे जिल्ह्यात भाजपाने यामुळे शिवसेनेला जोरदार झटका दिला आहे.

आशाताई बुचके शक्तीप्रदर्शन करत पुण्याहून मुंबईला रवाना झाल्या. मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या भाजपाप्रवेश करणार आहेत. यावेळी माजी मंत्री बाळा भेडके हेदेखील उपस्थित असणार आहेत. जवळपास १५ वर्ष त्यांनी शिवसेनेचं काम केलं होतं, मात्र २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर जुन्नर तालुक्यात मोठा राजकीय बदल शिवसेनेने केला होता. महिलांचे मोठं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या आशा बुचके यांची शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आली होती. आता त्या भाजपचा झेंडा हाती धरणार आहेत.

आशाताई बुचके या वैष्णवधाम-बुचकेवाडी (ता. जुन्नर) येथील असून पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या माजी गटनेत्या आहेत. आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळासाहेब दांगट यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यावर आशाताई बुचके यांच्याकडे जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे नेतृत्वाची धुरा आली होती.

हे ही वाचा:

तालिबानला पोसणाऱ्या देशांनाच तालिबानचा धोका?

अश्रफ घनी ‘या’ देशात पळाले

तालिबानने कब्जा केल्यामुळे भारतातला सुकामेवा महाग होणार?

शिवसेनेचे नारायण राणेंविरोधात सुडाचे राजकारण

२०१४ मध्ये आशाताईंनी शिवसेनेकडून जुन्नर विधानसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र केवळ पाच हजार मतांच्या फरकाने त्यांना मनसेच्या शरद सोनावणेंकडून पराभव स्वीकारावा लागला होता. २०१९ मध्ये मनसेचे तत्कालीन आमदार शरद सोनवणे शिवसेनेत आले आणि त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले. त्यानंतर बुचकेंनी अपक्ष निवडणूक लढवत तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा