विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावात आज प्रचारसभेत शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेनेवर निशाणा साधला. संजय राऊत यांनी बुधवारी (१४ एप्रिल) बेळगावात प्रचारसभा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज बेळगावात भव्य सभा घेतली. या सभेत त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. “संजय राऊत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपावर गोळी चालवून काँग्रेसला मदत करण्यासाठी या ठिकाणी आले. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उरलेली नाही”, असा घणाघात फडणवीस यांनी यावेळी केली.
“आता महाराष्ट्रात शिवसेना उर्दूत कॅलेंडर छापतेय. त्या कॅलेंडरमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव छापत आहे. म्हणून या कर्नाटकात जी काँग्रेस टीपू सुलतान जयंती साजरी करते त्यांना निवडून देण्याकरता शिवसेना नेते इथे आले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काँग्रेसला जिंकवण्याचा प्रयत्न सुरु आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
राज ठाकरेंनी मानले मोदी सरकारचे आभार
मुंबईत सॅनिटाझर यंत्रणा बसविण्यासाठी जनहित याचिका दाखल
रामायण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
ठाण्यातील जम्बो कोविड सेंटर वापराविना
“इथे पोटनिवडणुक आहे. आमच्या वैनी या निवडणुकीला उभ्या आहेत. आपण सगळे दु:खात आहोत. अशा परिस्थितीत ही निवडणूक आहे. मग संजय राऊत या ठिकाणी का आले? याचं उत्तर मला सापडलं. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधल्या आणि गुण नाही तर वाण लागला, अशी अवस्था झालीय. काँग्रेसच्या सोबत राहून शिवसेनेने अजाण स्पर्धा घेतली. आम्ही महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवगान स्पर्धा घेऊ. आम्ही छत्रपती उदयनराजे यांच्यासोबत शिवगान स्पर्धा घेतली”, असं फडणवीस यांनी सांगितलं.