केरळ निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याने ठोकला रामराम

केरळ निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याने ठोकला रामराम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी सी चाको यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकला. पी सी चाको हे काँग्रेस पक्षाचे केरळमधील ज्येष्ठ नेते होते. केरळच्या थ्रिसूर मतदार संघातून ते लोकसभेचे खासदार म्हणून निवडून देखील आले होते. केरळमध्ये विधानसभा निवडणुका एक महिन्यावर येऊन ठेपलेल्या असताना पीसी चाको यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने पार्टीचा राजीनामा देणे हा काँग्रेससाठी धक्का मानला जात आहे. चाको यांनी केरळमध्ये काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी असल्याचा आरोप केला आहे.

केरळमध्ये ६ एप्रिलला विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. केरळमध्ये गेली अनेक दशके दवे आणि काँग्रेस यांची आळीपाळीने सत्ता आलेली आहे. २०१६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांच्या आघाडीला बहुमत मिळाले होते. डावे प्रणित आघाडी असलेल्या एलडीएफ पक्षांना २०१६ मध्ये ९१ जागांवर विजय मिळाला होता. तर काँग्रेस प्रणित आघाडी युडीएफला ४७ जागांवर विजय मिळाला होता. आळीपाळीने सरकार बदलत असल्यामुळे २०२१ मध्ये आता काँग्रेसचे सरकार येणे अपेक्षित आहे. परंतु २०२० मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आणि अनेक स्वतंत्र संस्थांनी केलेल्या जनमत चाचण्यांमधून एलडीएफ आघाडीवर असल्याचे समजत आहे.

हे ही वाचा:

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांचा राजीनामा

पीसी चाको यांचा राजीनामा हा काँग्रेस पक्षाच्या ‘जी-२३’ बंडाच्या पार्श्वभूमीवर विशेष लक्षणीय आहे.

Exit mobile version