सीबीएसईच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या ‘या’ प्रश्नावरून वादंग

सीबीएसईच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या ‘या’ प्रश्नावरून वादंग

कालच्या इयत्ता १२वीच्या समाजशास्त्र बोर्ड परीक्षेच्या पेपरमध्ये विचारलेल्या अयोग्य प्रश्नाबद्दल आज सीबीएसईने माफी मागितली. दहावी आणि बारावीच्या पहिल्या टर्मच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा आता प्रक्रियेत आहेत. सीबीएसई इयत्ता १२ ची पहिली मोठी परीक्षा काल पार पडली.

“२००२ मध्ये गुजरातमध्ये अभूतपूर्व प्रमाणात आणि मुस्लिमविरोधी हिंसाचाराचा प्रसार कोणत्या सरकारच्या अंतर्गत झाला?” एमसीक्यूवर आधारित पेपरमध्ये काँग्रेस, भाजपा, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन असे चार पर्याय होते.

“आजच्या बारावीच्या समाजशास्त्र पहिल्या टर्मच्या परीक्षेत एक प्रश्न विचारण्यात आला आहे जो अयोग्य आहे. प्रश्नपत्रिका सेट करण्यासाठी बाह्य विषय तज्ञांसाठी असलेल्या सीबीएसई मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे. सीबीएसई चूक मान्य करते आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करते.”

“पेपर सेटरसाठी सीबीएसई मार्गदर्शक तत्त्वे स्पष्टपणे सांगतात की त्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की प्रश्न केवळ शिक्षण केंद्रित असले पाहिजेत. ते वर्ग, धर्म तटस्थ असावेत. सामाजिक आणि राजकीय निवडींवर आधारित लोकांच्या भावनांना हानी पोहोचवू शकतील अशा विषयांना स्पर्श करू नये.” असे एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

भारतीय ऍप ‘कू’ने मिळवला ‘हा’ सन्मान

भाजपाने सुरू केली मथुरेची तयारी?

उत्तर कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

ममता बॅनर्जी यांनी केला राष्ट्रगीताचा अपमान!

अशा पद्धतीने राजकीय स्थितीवर ज्यावर तथ्याधारित प्रश्न न विचारता, राजकीय मतभेदांवर आणि तंट्यांच्या विषयांवर प्रश्न विचारले गेल्याने नेटकरी संतापले आहेत.

Exit mobile version