भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांनी फेसबुकवरून ही घोषणा केली आहे. तसेच त्यांनी खासदारकीचा राजीनामाही दिला आहे.
बाबुल सुप्रियो यांनी फेसबुकवरून ही घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावनाही व्यक्त केल्या आहेत. सामाजिक कार्य करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षात राहण्याची आवश्यकता नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. अलविदा… मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. टीएमसी, काँग्रेस, सीपीआयएम या पैकी मला कुणीच बोलावलं नाही. मी कुठेच जात नाही. सामाजिक कार्य करण्यासाठी राजकीय पक्षाची गरजच नाही, असं सुप्रियो यांनी म्हटलं आहे.
राजकारणापासून वेगळे झाल्यानंतरही आपलं उद्देश पूर्ण करता येतं, असं त्यांनी सांगितलं. तसेच आपण कायम भाजपाच्या विचारधारेशी बांधिल राहू असंही त्यांनी म्हटलं आहे. माझा हा निर्णय ‘ते’ समजून घेतील, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे.
हे ही वाचा:
मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही
पीव्ही सिंधू पराभूत होऊनही पदकाची आशा?
एवढ्या पूरग्रस्त परिस्थितीत राऊत कधी पाण्यात उतरले का?
मला केव्हाच पक्ष सोडायचा होता. बऱ्याच दिवसांपासून मनात हे घोळत होतं. आता राजकारणात राहायचं नाही, असं मनानं ठरवलं होतं. मात्र, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यामुळे मी प्रत्येकवेळी निर्णय मागे घेतला. आता तर काही नेत्यांशी झालेले वाद उघड झाले आहेत. त्यामुळे अशा वेळी राजकारणात राहणं योग्य नसल्याचं वाटलं. त्यामुळेच राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.