31 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामा'या' राष्ट्रवादी आमदाराच्या मुलावर गोळीबार प्रकरणात गुन्हा दाखल

‘या’ राष्ट्रवादी आमदाराच्या मुलावर गोळीबार प्रकरणात गुन्हा दाखल

Google News Follow

Related

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे कथित गोळीबार प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. कंत्राटदार अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारसह तिघांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने आमदार आणि त्यांच्या मुलाच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे. तर आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या पीएसह २१ जणांवर अपहरण आणि जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप तानाजीने केला आहे. पण हा संपूर्ण घटनाक्रम आणि समोर येणाऱ्या बाबी पाहिल्या तर आमदारांचे काही दावे फोल ठरताना दिसत आहेत. तर दुसरीकडे तानाजी पवारप्रमाणे आमदार पुत्र आणि समर्थकांना अटक होणार का? हा देखील प्रश्न आहेच.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला. झाडलेल्या दोन्ही गोळ्यांमधून आमदार सुखरुप बचावले. घटनास्थळी २० ते ३० कार्यकर्ते उपस्थित होते, त्यापैकी कोणीही जखमी नाही. पालिकेचे कंत्राटदार सिजू अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली. “मी स्वतः तानाजीला बोलाऊन घेतलं होतं, त्यानंतर त्याने एकेरी उल्लेख केला, त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला आणि त्याने माझ्या दिशेने गोळीबार केला, सुदैवाने मी यातून बचावलो,” असं आमदार बनसोडे यांनी पोलिसांना सांगितलं. तानाजी हे सीआरपीएफचे निवृत्त जवान असल्याचंही समोर आलं. मग पत्रकार घटनास्थळी पोहोचले आणि कॅमेऱ्यासमोर वरील घटनाक्रम सांगितला. राज्यातील सत्ताधारी आमदारांवर गोळीबार म्हणजे धक्कादायक घटना, बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी तातडीने तानाजीला अटक केली. पण गोळी ना आमदारांना, ना उपस्थितांना लागली मग गोळीची खूण शोधण्याचं काम सुरु झालं. पण काही केल्या पोलिसांना ती खूण सापडत नव्हती.

आमदार बनसोडे आणि तानाजी पवार यांच्यामधील ११ मे रोजी फोनवरुन झालेल्या संवादाची क्लिप समोर आली. यात आमदार शिवीगाळ करुन तानाजीला धमकावत आहेत. तानाजी मात्र आपण योग्य भाषा वापरावी, असं अनेकदा सांगत होता. परंतु  संतापलेल्या आमदारांनी तू उद्या ये मग बघू, असं त्यात धमकावले. एक मिनिट चाळीस सेकंदाची ही संपूर्ण ऑडिओ क्लिप एबीपी माझाने प्रसारित केली असून वेबसाईटवरील बातमीत त्या क्लिपमधील संपूर्ण संभाषण आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान जिल्हाधिकाऱ्यांना देणार कानमंत्र

मुंबई महानगरपालिकेकडून लसींसाठी ग्लोबल टेंडर

उपमुख्यमंत्र्यांची ‘सोशल’ उधळपट्टी

मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झापले

अँथोनी यांच्या आकुर्डी येथील कार्यालयासमोर ११ मे रोजी घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले. यात आमदार पुत्र सिद्धार्थ, त्यांच्या पीएसह दहा जणांनी कार्यालयात प्रवेश केला. जमावबंदी कायदा लागू असताना गोंधळ घातला. तानाजी पवार कुठे आहे, ते सांगा असं उपस्थित कर्मचाऱ्यांना त्यांनी धमकावले. पण माहित नाही, असं म्हणताच दोन कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर खेचण्यात आलं. तिथेच घातक शस्त्राने दोघांवर हल्ला झाला. हे सीसीटीव्हीमधील दृश्यांनी समोर आणलं. या आधारावर आमदार पुत्र सिद्धार्थ, त्यांच्या पीएसह दहा जणांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी निगडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा