महाराष्ट्राच्या ‘या’ मंत्र्याला कोविड-१९ ची लागण…

महाराष्ट्राच्या ‘या’ मंत्र्याला कोविड-१९ ची लागण…

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोविड-१९ ची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. छगन भुजबळ यांनीच ट्विट करून ही बातमी दिली आहे.

“माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.” असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे. तसेच, “माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.” असेही ते म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा काल नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भुजबळ यांनी हजेरी लावली होती. लग्न सोहळा पार पडून २४ तासही उलटले नाहीत, तेवढ्यातच भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

“महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा”- अतुल भातखळकर

कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माध्यमांसमोर येऊन जनतेला आवाहन करून गेले की, लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात साजरे करू नका. शिवाय त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्याचे लग्नाचा ठरलेला कार्यक्रम रद्द केल्याबद्दल अभिनंदनही केले होते. परंतु मुख्यमंत्री जनतेला उपदेश देत असताना, त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मात्र लग्न समारंभात होते.

Exit mobile version