लोक जनशक्ती पार्टीचे खासदार आणि चिराग पासवान यांचे चुलत बंधू प्रिन्स राज पासवान यांच्याविरुद्ध एका महिलेल्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला लोक जनशक्ती पार्टीची कार्यकर्ता असल्याचे समजते. दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलिसांकडे तीन महिन्यांपूर्वीच महिलेने तक्रार केली होती. प्रिन्स राज यांनी आपल्यावर अत्याचार केले आणि धमकावले, असे महिलेने तक्रारीत म्हटले होते. प्रिन्स राज हे बिहारच्या समस्तीपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. दिल्ली पोलिसांनी प्रिन्स राज यांच्यावर ३७६, ३७६ (२)(के), ५०६, २०१, १२० बी या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
तीन महिन्यांपूर्वी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर पीडितेने न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानंतर खासदार प्रिन्स राज यांच्याविरोधात बलात्काराच्या कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मात्र, जेव्हा पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार केली, तेव्हा खासदार राजकुमार राज यांनीही पीडितेच्या विरोधात तक्रार केली होती.
लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) संस्थापक आणि दिवंगत नेते रामविलास पासवान यांच्या पहिल्या जयंती दिनानिमित्त चिराग पासवान यांनी १२ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी छापलेल्या कार्डवर काका पशुपती पारस आणि चुलत भाऊ राजकुमार राज यांची छापली होती. पशुपती पारस आणि राजकुमार राज या दोघांनीही चिराग पासवान यांच्याकडे पाठ फिरवली आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री महोदय…आधी मंत्रिमंडळातील बलात्काऱ्यांवर कारवाई करा
अभिमानास्पद! भारतात लसीकरणाचा ‘अमृत महोत्सव’
रक्षकच बनला भक्षक! पोलिसाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण
ज्योती देवरेंच्या बदलीवरून चित्रा वाघ आक्रमक
खासदार प्रिन्स राज यांनी १० फेब्रुवारी २०२१ रोजी संबंधित महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी प्रिन्स राज यांनी म्हटले होते की, एका महिलेने माझ्यावर काही आरोप केले आहेत. त्यामुळे मी १० फेब्रुवारी रोजीच तक्रार दाखल केली होती. यावेळी मी पोलिसांकडे सर्व पुरावे सादर केल्याचेही प्रिन्स राज यांनी म्हटले.