मोदींनी का केले किरण रिजिजूंचे कौतुक?

मोदींनी का केले किरण रिजिजूंचे कौतुक?

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू बुधवारी अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होते. एका गावातील रहिवाशांसोबत एका प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेताना रिजिजू स्थानिक रहिवाश्यांसोबत नाचताना दिसले. व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री रिजिजू यांना “उत्तम डान्सर” असल्याचं म्हणाले.

ईशान्य राज्यातील काजलंग गावातील स्थानिक साजोलांग लोकं ज्यांना मिजी म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी त्यांचे पारंपरिक गाणे आणि नृत्याने मंत्री रिजिजू यांचे स्वागत केले.

शर्ट, ट्राउजर आणि बूट घातलेले श्री रिजिजू, गावकऱ्यांसोबत त्यांच्या आनंदात सहभागी होताना दिसून आले. झांज आणि ढोल ताशांच्या गजरात रिजिजूंनी पारंपारिक लोकगीतांवर नृत्य केले. यावर तिथे जमलेल्या लोकांनीही जल्लोष करत टाळ्या वाजवल्या.

“विवेकानंद केंद्र विद्यालयाच्या प्रकल्पांचे निरीक्षण करण्यासाठी सुंदर काजलंग गावाच्या माझ्या भेटीदरम्यान. जेव्हा पाहुणे त्यांच्या गावाला भेट देतात तेव्हा साजोलंग परंपरेप्रमाणे ते नाचून स्वागत करतात. मूळ लोकगीते आणि नृत्य अरुणाचल प्रदेशातील प्रत्येक समाजाचे सार आहेत.” असं किरण रिजिजू यांनी कू ऍप्प वर लिहिलं.

हे ही वाचा:

सर्वोच्च न्यायालयाची ‘शेतकरी’ आंदोलकांना चपराक

… आता निश्चितच काँग्रेसमध्ये राहणार नाही

बंगालमध्ये मतदान केंद्रावर बॉम्बहल्ला करणाऱ्या टीएमसी नेत्याला अटक

अमरिंदर सिंग-अजित डोवाल भेटीत नेमके काय घडले?

“आमचे कायदा मंत्री किरण रिजिजू देखील उत्तम डान्सर आहेत. अरुणाचल प्रदेशची चैतन्यशाली आणि गौरवशाली संस्कृती पाहून आनंद झाला,” असं ट्विट करत पंतप्रधान मोदी यांनी रिजिजू यांचे कौतुक केले.

Exit mobile version