30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरराजकारणनियतीचा सूड म्हणतात तो हाच

नियतीचा सूड म्हणतात तो हाच

Google News Follow

Related

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला वेळ देत नाहीत, अशी खंत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांकडे व्यक्त केली. यावर भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी राजू शेट्टींना ट्विट करत टोला लगावला आहे.

“काय दिवस आलेत राजू शेट्टींवर, ज्या पवारांनी त्यांची जात काढली त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यांना अश्रू ढाळावे लागतायत. नियतीचा सूड म्हणतात तो हाच.” असं ट्विट अतुल भातखळकरांनी  केलं आहे.

नवीन कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली होती पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठलेही उत्तर आले नाही, असं राजू शेट्टी यांनी शरद पवार यांना सांगितलं. त्यावर पवारांनी याविषयी जातीने लक्ष घालून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुमच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणू, असं आश्वासन शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना दिलं.

राजू शेट्टी यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांनी यावेळी अजित पवार यांनं दिलं. केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी बांधवांच्या भावना राज्य सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी आजची भेट असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं. तसंच या कायद्यावर महाविकास आघाडी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असं राजू शेट्टी अजित पवार यांना म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करते आणि हे सरकार कायम शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभे राहील. शेतकरी हिताचे पाऊल उचलण्यात सरकार मागे हटणार नाही, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेवेळी शिष्टमंडळाच्या नेत्यांना दिलं.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारमध्ये पब,डिस्को,बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात

सेंट्रल विस्टा विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा दणका

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा ठरल्या

महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला कापरं भरलंय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या भेटीच्या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर, प्रतिभा शिंदे, एस. व्ही. जाधव, अशोक ढवळे, नामदेव गावडे, सुभाष लोमटे, किशोर ढमाले, सीमा कुलकर्णी, सुभाष काकस्ते, उमेश देशमुख, शकील अस्मेद आदी मान्यवर होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा