राज्य सरकारने लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता दिली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्यानेही खुली करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अजूनही मंदिर उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. ये है उद्धव ठाकरे का ‘नया महाराष्ट्र’, असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
नितेश राणे यांनी ट्विट करून हा टोला लगावला आहे. महाराष्ट्रात मंदिर बंदच राहणार!! कारण… हिंदू धर्माला आव्हान देणारे सरकार महाराष्ट्रात आहे… हिंदू हो, तो डर के रहो… ये है उद्धव का “नया” महाराष्ट्र, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. नितेश राणे यांनी अत्यंत खोचकपणे मुख्यमंत्र्यांवर ही टीका केली आहे. त्यामुळे त्याला शिवसेनेतून काय उत्तर येतं हे पाहावं लागणार आहे.
महाराष्ट्रात मंदिर बंदच राहणार!!
कारण..
हिंदू धर्माला आव्हान देणारे सरकार महाराष्ट्रात आहे..
हिंदू हो..
तो डर के रहो..
ये है उद्धव का "नया" महाराष्ट्र !!— nitesh rane (@NiteshNRane) August 18, 2021
१५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी कोरोना लसीचे दोन डोस आणि दुसऱ्या डोसनंतर १४ दिवस होणं गरजेचं आहे. याचा पुरावा दाखवल्यावर प्रवाशांना लोकलचे पास दिले जातील. तसंच बेकायदेशीररित्या प्रवास केल्यास ५०० रुपये दंडासह उचित कारवाई केली जाणार आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने का झापले?
अफगाणिस्तान विषयावर मोदींनी घेतली महत्वाची बैठक
तालिबानचे ‘उदार’ धोरण एका दिवसात बंद
हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना ५० टक्के मर्यादेनं रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वेटिंगला थांबलेले ग्राहक, वेटर, हॉटेल चालक यांनी मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. विवाह सोहळ्यांबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खुल्या प्रांगणात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी २०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी आसन क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेनं परवानगी देण्यात आली आहे. सिनेमागृह , नाट्यगृह , धार्मिक स्थळे मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. असे आदेश सरकारने दिले आहेत.