‘हे’ आहे त्रिपुरा आणि महाराष्ट्रातील आंदोलनांचे कनेक्शन

‘हे’ आहे त्रिपुरा आणि महाराष्ट्रातील आंदोलनांचे कनेक्शन

त्रिपुरामधील घटनेचे पडसाद महाराष्ट्रातच कसे उमटले, असा सवाल उपस्थित होत असताना त्यामागील वास्तव नेमके काय असावे, याचे उत्तर हळूहळू मिळू लागले आहे, असे म्हणायला वाव आहे. ऍनालायझर या यूट्युब चॅनेलच्या माध्यमातून काही व्हीडिओ, फोटोंच्या आधारे हे कारस्थान जाणीवपूर्वक रचले गेले असेल, अशी शक्यता व्यक्त केली गेली.

ऍनालायझरचे सुशील कुलकर्णी यांनी या व्हीडिओत काही व्हीडिओ, फोटो शेअर करत त्रिपुरातील कथित घटना आणि महाराष्ट्राचे कनेक्शन आहे का असा सवाल उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात झालेल्या आंदोलनांत नांदेड, अमरावती, मालेगाव येथे मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाचे लोक रस्त्यांवर उतरले होते. त्यानंतर या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झाले आणि दगडफेक, दुकानांची तोडफोड, पोलिसांच्या गाड्यांवर हल्ले, पोलिसांवर हल्ले झाले आहेत. पण हे थेट त्रिपुरात झालेल्या घटनेचे पडसाद होते का की हे वेगळे कारस्थान होते, असा सवाल आता उपस्थित होतो आहे. यासंदर्भातील दोन व्हीडिओतून हे स्पष्ट होते की, महाराष्ट्रातील आंदोलनांची तयारी आधीच केली गेली होती. एका व्हीडिओत एक मुस्लिम इसम ध्वनिक्षेपकावर घोषणा करताना म्हणतो की, गांधी मार्केट बंद राहील. बंद असताना कुणी दुकान उघडले तर त्याचे परिणाम लक्षात ठेवा. दुसऱ्या व्हीडिओत दिसते येणाऱ्या जुम्माला म्हणजे शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) आपण सगळ्यांनी दुकाने बंद ठेवायची आहेत. नांदेडच्या इतिहासातच नव्हे तर महाराष्ट्रात येणाऱ्या शुक्रवारी सगळ्यांनी बंद पाळायचा आहे. हजारोच्या संख्येने आपण जमायचे आहे सोबत प्रत्येकाने पाच जणांना सोबत घेऊन यायचे आणि १२ तारखेला जमायचे आहे. असे आंदोलन कधीही झालेले नसेल हे लक्षात ठेवायचे आहे, असे या व्हीडिओत एका बैठकीत एक इसम बोलत असतो.

या समुदायाला भडकाविण्यासाठी शुक्रवारच्या आधीच बैठका घेतल्या गेल्या आणि बंद कसा करायचा याची तयारी केली गेली हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे महाराष्ट्रात झालेली ही निदर्शने, मोर्चे ही त्रिपुरातील न घडलेल्या घटनेची स्वाभाविक प्रतिक्रिया नव्हती तर हे सगळे सुनियोजित होते.

असिफ मुजतबा हा पत्रकार आणि शाहीन बाग कार्यकर्ता आहे, असे म्हणवतो. दिल्लीतला रहिवासी असलेला मुजतबा ट्विट करत काही फोटो पोस्ट करतो. त्या फोटोतून तो दाखवू पाहतो की, बघा अशा प्रकारे त्रिपुरा जळतो आहे. त्याच्या या फोटोंत धार्मिक ग्रंथ घेतलेले दोन युवक, जाळपोळ झालेली काही स्थळे असे दिसते. तेव्हा त्रिपुरात खूप भयंकर चालले आहे असे वरकरणी कुणालाही वाटेल. पण २८ ऑक्टोबरला त्याने टाकलेले हेच फोटो याआधी १३ जून २०२१मध्ये पोस्ट झाल्याचे लक्षात येते. ते दिल्लीतील हिंसाचाराचे आहेत. चार महिन्यांपूर्वीचे फोटो पोस्ट करत त्रिपुरात ही जाळपोळ घडल्याचे तो दाखवतो.

असाच एक व्यक्ती म्हणजे साद अहमद. तो उत्तर प्रदेशमधला आहे. त्याच्या ट्विटमधून महाराष्ट्र कनेक्शन स्पष्ट होते. तो व्हीडिओ पोस्ट करतो. त्यात एक पोलिस अधिकारी उलटा चालत जय श्रीरामच्या घोषणा देत आहे. त्याच्यासमोर एखादा जमाव असावा, असे दिसते. या व्हीडिओवर साद अहमद म्हणतो की, पोलिसच साथ देत असल्यामुळे पाहा त्रिपुरा जळत आहे. त्रिपुरा पोलिस कशी साथ देत आहेत बघा. हा खरे तर व्हीडिओ पटना न्यूज चॅनलवरचा २०१८ला प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे व्हीडिओ साडेतीन वर्षांपूर्वीचा आहे. हा व्हीडिओ बिहारमधील असून त्यात हा पोलिस रामनवमीच्या निमित्त निघालेल्या मिरवणुकीत जय श्रीरामच्या घोषणा देत आहे. म्हणजे असे व्हीडिओ शेअर करून त्याद्वारे लोकांची डोकी भडकाविण्याचा प्रकार हा माणूस करतो.

 

हे ही वाचा:

शिल्पा शेट्टी-राज कुंद्रावर गुन्हा

टी-२० वर्ल्डकपचा नवा विजेता कोण?

‘हे मायावी बसतात दुसऱ्याबरोबर आणि सरकार बनवतात तिसऱ्याबरोबर’

श्वानाची सजगता आणि पकडले गेले ९० कोटींचे ड्रग्स

 

साद अहमद याचे महाराष्ट्राशी कनेक्शन आहे. दोन माणसांची विधानं तो नियमित रिट्विट करतो. एक आहेत नवाब मलिक आणि आणखी एक व्यक्ती आहे ते म्हणजे संजय राऊत. त्यांचेही ट्विट साद अहमदने रिट्विट केले आहे. नवाब मलिक, साद अहमद, संजय राऊत यावरून त्रिपुरा आणि महाराष्ट्रातील आंदोलने यांचे काही कनेक्शन आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

Exit mobile version