मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. अखेर पोलिसांनी रत्नागिरीतील संगमेश्वर येथून नारायण राणे यांना अटक केली. नारायण राणेंच्या अटकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या अटकेमुळं महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. पोलीस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
केंद्रीय मंत्री श्री नारायणराव राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे.
पोलिस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो.
शर्जिल उस्मानी मोकाट आणि
नारायण राणे यांना अटक!हे आहे नवे हिंदूत्त्व आणि
असा आहे नवा महाराष्ट्र !!!#NarayanRane— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 24, 2021
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री श्री नारायणराव राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे. पोलीस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. शर्जिल उस्मानी मोकाट आणि नारायण राणे यांना अटक! हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र !!!, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानमध्ये युक्रेनच्या विमानाचे अपहरण
भारत अफगाणिस्तानचा खरा मित्र, पाकिस्तानकडून तालिबानला फूस
मला रत्नागिरीत का जाऊ दिले जात नाही?
राणेंच्या अटकेने काय पडसाद उमटतील, याचा विचार केलाय का?
नारायण राणेंना ताब्यात घेतल्यानंतर आता कोर्टामध्ये कसं हजर करायचं याचीही कायदेशीर माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. ही अटक संगमेश्वरमधून करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर राणे हे त्यांच्याच गाडीतून संगमेश्वर पोलिस ठाण्यात गेले. तिथे राणे यांच्या कार्यकर्त्यांनी गाड्या अडविण्याचा प्रयत्न केला. या अटकेपूर्वी राणे यांनी रत्नागिरी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, पण तो फेटाळण्यात आला. शिवाय, मुंबई उच्च न्यायालयातही एफआयआर रद्द करण्यासंदर्भात तातडीची सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली, त्यालाही न्यायालयाने त्वरित सुनावणी घेण्यास नकार दिला.