हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी असे केले शेकडो कोटींचे घोटाळे

हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी असे केले शेकडो कोटींचे घोटाळे

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारच्या नेत्यांविरोधात आरोपांची मालिका चालूच ठेवली आहे. आधी ११ जणांवर थेट आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी २७०० पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत.

माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, “ठाकरे सरकारच्या डर्टी ११ संघामध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे. मी आणखी एका नेत्याचं नाव यात वाढवत आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुशरीफ यांचं नाव मी या संघामध्ये वाढवत आहे. हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. २७०० पानांची एक फाईल मी आयकर विभागाला दिली आहे.”

बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी २ कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, २ कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे.

हे ही वाचा:

देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, केरळमध्ये मात्र भयावह स्थिती

शिवसेना उत्तर प्रदेश निवडणूकीच्या रिंगणात! यावेळी तरी डिपाॅझिट वाचणार?

ठाकरे सरकार बेजबाबदार आणि असंवेदनशील! महिला आयोगाचे ताशेरे

पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणारा ख्रिस्ती भोंदू अटकेत

शेल कंपन्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या मुलाने दोन कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला. संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये मुश्रीफांनी १०० कोटी रुपये गुंतवले ते बेनामी असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केलाय. उद्या आपण मुश्रीफांच्या विरोधात ईडीकडे तक्रार करणार असून पुरावे देणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

Exit mobile version