25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणमंत्रालयात दारूच्या बाटल्या ही काळीमा फासणारी घटना

मंत्रालयात दारूच्या बाटल्या ही काळीमा फासणारी घटना

Google News Follow

Related

मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. ही महाराष्ट्रातील परंपरेला काळीमा फासणारी घटना असून या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा? याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

या गंभीर प्रकरणाची अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन १५ दिवसांच्या आत उच्चस्तरिय चौकशी करण्याची मागणीही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो तेथे जर सर्वसामान्यांना प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. मात्र मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारूच्या बाटल्या आत आल्याच कशा? असा सवाल दरेकर  यांनी उपस्थित केला. दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये मिळणे ही दुर्दैवी, चीड आणणारी व शरम आणणारी अशी घटना आहे, अशी टीका त्यांनी केली.

हे ही वाचा:

गेले देशमुख कुणीकडे?

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?

नीरज चोप्राचा ‘असा’ होणार सन्मान

पुणे मेट्रो विरोधकांना उच्च न्यायालयाचा फटकार

या गंभीर प्रकरणासंदर्भात दरेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. मंत्रालायात आपले प्रश्न सोडवण्यासाठी दर दिवशी हजारो नागरिक मंत्रालायत येत असतात, पण या नागरिकांना मंत्रालय प्रवेशासाठी सुरक्षेच्या कारणास्तव अडवणूक केली जाते. त्यांच्याकडील सर्व सामानाची काटेकोरपणे तपासणी केली जाते. त्यानंतरही त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव कधी-कधी प्रवेश नाकारण्यात येतो. सामान्य नागरिकांच्या बाबतीत एवढी दक्षता घेतली जात असताना मंत्रालय उपहार गृह परिसरापर्यंत दारुच्या बाटल्या सर्रासपणे कशा पोहचतात? असा सवालही दरेकर यांनी या पत्रात उपस्थित केला आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची १५ दिवसांच्या आत उच्च स्तरिय चौकशी करण्याची मागणी दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा