25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारणही जगताप साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे'

ही जगताप साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे’

अश्विनी जगताप यांना निवडणुकीत विजयी होणारच असा विश्वास

Google News Follow

Related

चिंचवड पोटनिवडणुकीत पोस्टल मतदानातं भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. लक्ष्मण जगताप यांची आठवण काढत अश्विनी जगताप बोलत होत्या.  सलग दोन फेऱ्यांमध्ये त्या आघाडीवर असून महाविकास आघाडीचे नाना काटे यांना त्यांनी पिछाडीवर ठेवले आहे. ‘मी पोस्टल मतदानात आघाडीवर आहे ही  जगताप  साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे’. आम्ही हि निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली आहे. मेट्रो सिटी आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आम्ही विकास करणार आहोत. असे अश्विनी जगताप यांनी सांगितले आहे. या निवडणुकीत मला कसलीच धाकधूक वाट नसल्याचे अश्विनी जगताप पुढे म्हणाल्या आहेत. कारण आमचा विजय निश्चित होणार असल्याचे त्या पुढे म्हणाल्या आहेत.

पोस्टल मतदानात अश्विनी जगताप यांना ४०० मते मिळाली असून दुसऱ्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांना आघाडी कायम आहे. अश्विनी जगताप यांना ४०५३ मते मिळाली आहेत तर नाना काटे यांना ३६०४ मते तर अपक्ष राहुल कलाटे यांना १२७३ मते मिळाली आहे. चिंचवड मतदार संघात खरतर आमदार  लक्ष्मण  जगताप यांचे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये भाजपकडून  लक्ष्मण   जगताप यांच्या पत्नी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडी या पक्षाकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच वेळी मागच्या निवडणुकीत द्वितीय स्थानावर राहिलेले राहुल कलाटे यांनी अपेक्षा म्हणून उमेदवारी मिळाली होती.

हे ही वाचा:

राहुल गांधी आता तपस्वी नाहीत

संजय राऊत यांनी महाराष्ट्रद्रोह केला आहे!

शेकापला फटका, धैर्यशील पाटील भाजपात दाखल

‘कोविड प्रकरणात जवळच्या माणसाला अटक केल्यामुळे संजय राऊत प्रचंड निराश’

त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. म्हणूनच ही तिरंगी लढत हि आज चिंचवडमध्ये बघायला मिळत आहे. त्यात सुद्धा अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. चिंचवड मतदार संघात अश्विनी जगताप यांनी  लक्ष्मण   जगताप यांनी केलेल्या विकास कामाची आठवण करून मते मागितली होती. तर दुसऱ्या बाजूला अपेक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरून महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे. महाविकास आघडीचे राष्ट्रवादीचे नाना कलाटे यांना उमेदवारी दिली होती. म्हणूनच या उमेदवारासाठी अजित पवार यांच्याबरोबरच दिग्गज नेत्यांनी प्रचार करत    नाना   काटे यांना निवडणूक जिंकण्यासाठी ताकद लावली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा