उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक्झिट पोलने खळबळ उडवून दिली आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीत आणि समाजवादी पक्षाच्या समर्थकांमध्ये जोरदार स्पर्धा रंगली आहे. भाजपा आणि सपा समर्थकांनी अशी अट घातली आहे जी आश्चर्यकारक आणि मनोरंजक आहे. एक्झिट पोलने भाजपच्या सत्तेत पुनरागमनाचा अंदाज वर्तवल्याने विरोधी पक्षांचे नेते गोंधळात पडले आहेत. मात्र, गुरुवारी मतमोजणी होणार असल्याने कोण बाजी मारतो याच्यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बदाऊनमध्ये दोन पक्षांच्या समर्थकांनी विचित्र बाजी लावली आहे. भाजपा समर्थक विजय सिंह आणि दुसऱ्या बाजूला समाजवादी समर्थक शेर अली यांच्या वादामुळे चार बिघा जमीन पणाला लागला आहे. या अटीशी संबंधित एक करार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचवेळी चौकाचौकात सुरू झालेला वाद चार बिघे जमिनीपर्यंत आला आहे.
हे प्रकरण बदायूं जिल्ह्यातील शेखूपूर विधानसभा मतदारसंघाचे आहे. येथील बिरियादंडी गावातील विजय सिंह आणि शेर अली यांच्यात एक्झिट पोलबाबत वाद झाला होता. ज्यामध्ये राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचे म्हटले आहे. पण, दोन्ही समर्थक भिन्न स्वभावाचे आहेत. राज्यात पुन्हा योगी सरकार स्थापन होणार असल्याचे विजय सिंह सांगतात, तर शेर अली म्हणतात की, यावेळी समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे.त्यामुळे या दोघांनी पैज लावली आहे. हे यांचे प्रकरण पंचायतीपर्यंत पोहोचले. त्यानंतर पंचायत बोलावण्यात आली. यावेळी दोघांनी एकअट घातली की जर भाजपचे सरकार झाले तर शेर अलीची चार बिघा जमीन एक वर्षासाठी विजय सिंहकडे राहील. ज्यावर तो शेती करेल. पण, जर समाजवादी सरकार स्थापन झाले तर विजय सिंह यांची जमीन शेर अलीला एक वर्षासाठी दिली जाईल, त्यावर ते शेती करतील.
हे ही वाचा:
राहुल गांधींचे पत्र मिळाले… संजय राऊत यांनी २२ दिवसांनी शेअर केले!
राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषीला जामीन मंजूर
भारतात स्थापन होणार जागतिक आरोग्य संघटनेचे पारंपरिक औषध केंद्र
….म्हणून फ्लिपकार्टने महिलांसमोर घातले लोटांगण
या प्रकरणात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कोणीही अटीच्या विरोधात जात नाही, म्हणून करार करण्यात आला आहे. ज्यामध्ये गावप्रमुख किशनपाल सेंगर, सतीश कुमार, जयसिंग शाक्य, कान्हीलाल, उमेश, राजीव कुमार, राजाराम यांच्यासह बारा जणांना साक्षीदार करण्यात आले आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर आता १० मार्चला ही चार बिघे जमीन कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.