पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. या महिन्यात भारताने आपला मौल्यवान वारसा भारतात परत आणला आहे. आजच्या मन की बात मधून त्यांनी ही माहिती सांगितली आहे. ते म्हणाले की, अथक परिश्रमाने अवलोकितेश्वर पद्मपाणी यांची हजार वर्षे जुनी मूर्ती इटलीहून परत आणली आहे, जी मूर्ती काही वर्षांपूर्वी बिहारमधून चोरी झाली होती.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी भारतात आणलेल्या मूर्तींबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, यापूर्वी अंजनेयार हनुमानजींचीही मूर्ती तामिळनाडूतून चोरीला गेली होती. ही मूर्ती सुमारे सहाशे ते सातशे वर्षे जुनी आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आम्हाला ती ऑस्ट्रेलियाकडून मिळाली आहे. परदेशात गेलेला आपला वारसा परत आणणे हे आपले कर्तव्य आहे, ही आपली सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जबाबदारी आहे.
अनेक देश भारताचा वारसा परत करण्यासाठी मदत करत आहेत, अमेरिका, ब्रिटन, हॉलंड, जर्मनी, सिंगापूर, कॅनडा या देशांकडून भारताला पूर्ण मदत मिळत आहे. इरीच्या बळावर सात वर्षांत दोनशेहून अधिक मूर्ती परत आणल्या आहेत. या मूर्तींवर भारतातील लोकांची श्रद्धाही जोडलेली असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
भाजपा खासदार जेपी नड्डा यांचे ‘या’ कारणासाठी ट्विटर हॅक
‘ऑपरेशन गंगा’चे तिसरे विमान भारतात दाखल
‘ठाकरे सरकारची मोड्स ऑपरेंडी ठरलेली आहे’
‘२५ वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेत ३ लाख कोटींपेक्षा अधिक भ्रष्टाचार’
हिंदीचा अभिमान असायला हवा
पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०१९ साली हिंदी ही जगातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा होती. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे. भाषा हे केवळ अभिव्यक्तीचे माध्यम नसून समाज आणि संस्कृतीचे रक्षण करते. एका घटनेचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, एकदा ते अमेरिकेला गेले होते आणि तेलगू कुटुंबाच्या घरी गेले असता त्या कुटुंबाचा एक नियम होता, ‘जेवणाच्या टेबलावर कुटुंबातील सर्व सदस्यांनी फक्त तेलुगूमध्येच बोलावे’.