23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरदेश दुनियाभारत-तैवानमधील 'हा' करार वाढवतोय चीनची चिंता

भारत-तैवानमधील ‘हा’ करार वाढवतोय चीनची चिंता

Google News Follow

Related

जागतिक सेमीकंडक्टर चिपच्या कमतरतेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, भारत तैवानशी चर्चा करत आहे. ब्लूमबर्गच्या एका विशेष अहवालानुसार, यामुळे वर्षाच्या अखेरीस सेमीकंडक्टर्सच्या उत्पादनातील घटकांवरील शुल्क कपातीसह भारतात चीप उत्पादन आणले जाऊ शकते.

ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे की, नवी दिल्ली आणि तैपेईमधील अधिकाऱ्यांनी अलिकडच्या आठवड्यात भेटून एका करारावर चर्चा केली आहे, ज्यामुळे भारतात अंदाजे $७.५ अब्ज किंमतीचा चीप प्लांट आणला जाईल. ज्यामध्ये ५जी उपकरणांपासून इलेक्ट्रिक कारपर्यंत सर्व काही पुरवले जाईल. तैवानशी हा करार झाल्यास चीनची चिंता वाढणार आहे.

बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील जागतिक नेते आणि अधिकारी सेमीकंडक्टर्सच्या जागतिक टंचाईमुळे चिंतेत आहेत, ज्यामुळे असंख्य देशांमध्ये उत्पादन आणि विक्रीला फटका बसला आहे. नजिकच्या काळात यावर कोणताही तोडगा दिसत नाहीये. सेमीकंडक्टर किंवा चिप्समध्ये जे गुणधर्म असतात ते कंडक्टर आणि इन्सुलेटरमध्ये असतात. सामान्यत: सिलिकॉनपासून बनवलेले असल्यामुळे, त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर विद्युत उपकरणांसाठी केला जातो. कार, लॅपटॉप, स्मार्टफोन, घरगुती उपकरणे आणि गेमिंग कन्सोल, या छोट्या वस्तू पॉवर डिस्प्ले आणि डेटा ट्रान्सफर सारखी अनेक कार्ये करतात. तर, पुरवठ्याची कमतरता कार, फ्रिज, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या विक्रीवर परिणाम करते.

हे ही वाचा:

लोकल रेल्वे बंद; मग शाळेत जायचे तरी कसे?

योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार! सात नव्या चेहऱ्यांना संधी

आज जागतिक नदी दिवस; पण मुंबईतील नद्या मरणपंथाला!

‘लिफ्ट करा दे’ च्या नादात अखिलेश यांची पोलखोल

अल्पावधीत उत्पादन वाढवता येत नाही. ब्लूमबर्ग अहवालात नमूद केल्याप्रमाणे, चिप्स बनवणे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ज्याला महिने लागतात. तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (टीएसएमसी) ही जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रॅक्ट चीपमेकर आहे, ज्यांच्या ग्राहकांमध्ये क्वालकॉम, एनव्हिडिया आणि ऍपलचा समावेश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा