जोपर्यंत देवेंद्र फडणवीस चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालेल- रामदास आठवले

जोपर्यंत देवेंद्र फडणवीस चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालेल- रामदास आठवले

जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार, असं केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. ते इंदापूर इथे बोलत होते.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले. त्यादरम्यान पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी काही काळ थांबले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. हे सरकार अजून किती दिवस टिकेल असा प्रश्न पत्रकारांनी रामदास आठवले यांना विचारला. त्यावर रामदास आठवले म्हणाले, “हे राज्य सरकार जोपर्यंत देवेंद्र फडणवीस चालू देतील तोपर्यंत चालेल.” तसेच सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली असून, महाराष्ट्राची बदनामी देशभर झाली आहे असं, रामदास आठवले म्हणाले.

हे ही वाचा:

आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय

रेमडेसिव्हिरचा तुटवडा असताना ठाकरे सरकारच्या मंत्र्याने केले ‘हे’ अजब विधान

पश्चिम बंगाल निवडणूक: हिंसाचारात पाच तरुणांचा मृत्यू

लॉकडाऊन संदर्भात सर्वपक्षीय बैठक, लवकरच लॉकडाउनचा निर्णय?

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विरुद्ध भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे असा थेट सामना होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे पुत्र भरीरथ भालके यांनाच तिकीट देण्यात आलंय. तर परिचारक गटाने मंजुरी दिल्यानंतर भाजपाकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली गेलीय. हे दोन्ही उमेदवार तगडे असल्यामुळे ही पोटनिवडणूक अतिशय चुरशीची ठरले अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.

Exit mobile version